Home बातम्या OnePlus Nord ला आव्हान देण्यासाठी येत आहे नवीन Poco स्मार्टफोन, टीजर आला समोर

OnePlus Nord ला आव्हान देण्यासाठी येत आहे नवीन Poco स्मार्टफोन, टीजर आला समोर

OnePlus Nord ला आव्हान देण्यासाठी Poco लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते, जो मार्केट मध्ये मिड-रेंज कॅटगेरी मध्ये सादर केला जाईल. याची माहिती स्वतः कंपनीचे प्रोडक्ट मार्केटिंग मॅनेजर Angus Kai Ho Ng यांनी ट्वीट करून दिली आहे. त्यांनी ट्विट करून विचारले आहे कि वनप्लस नॉर्ड विकत घ्यावा कि नवीन पोको स्मार्टफोनची वाट बघावी. त्यांच्या ट्वीट मध्ये #POCOcomingsoon चा वापर केला गेला आहे. यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी आपल्या नवीन पोको फोन वर काम करत आहे, जो वनप्लस नॉर्ड फोनचा प्रतिस्पर्धी म्हणून सादर केला जाईल. इतकेच नव्हे तर Poco च्या अधिकृत ग्लोबल अकाउंटने ट्वीटला उत्तर देताना नवीन पोको स्मार्टफोन लॉन्चची माहिती दिली आहे.

प्रोडक्ट मार्केटिंग मॅनेजर Angus Kai Ho Ng च्या ट्वीट मध्ये जास्त माहितीचा खुलासा झाला नाही. आशा आहे कि पोको चा नवीन फोन Xiaomi स्मार्टफोनचा रीब्रँडेड वर्जन म्हणून सादर केला जाईल किंवा हा अगदी नवीन नवीन स्मार्टफोन पण असू शकतो.

अलीकडेच पोकोचा नवीन फोन मॉडेल नंबर M2006C3MI सह ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड आणि TUV Rheinland वेबसाइट वर लिस्ट झाला होता. या मॉडेल नंबर व्यतिरिक्त फोनच्या खऱ्या नावाचा उल्लेख नव्हता. या मॉडेल नंबर सह पोकोचा नवीन फोन Poco C3 नावाने ब्लूटूथ एसआईजी वेबसाइट वर पण दिसला आहे. हा मॉडेल नंबर अलीकडेच लॉन्च झालेल्या Redmi 9C शी जोडलेला होता, त्यामुळे आगामी पोको फोन कदाचित रेडमी 9सी स्मार्टफोनचा रीब्रँडेड वर्जन असू शकतो.

काही दिवसांपूर्वी कंपनीने भारतात Poco M2 Pro लॉन्च केला होता जो काही बदलांसह पूर्णपणे Xiaomi Redmi Note 9 Pro सारखा होता. सोशल मीडिया वर POCO M2 Pro ला Redmi Note 9 Pro ची डुप्लीकेट कॉपी घोषित करण्यात आले होते. आता सर्टिफिकेशन्स साइट वर अजून एक पोको फोन दिसला आहे, ज्याचा मॉडेल नंबर Redmi 9C च्या ग्लोबल वर्जन सारखा आहे.

Redmi 9C

रेडमी 9सी चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन IMG PowerVR GE8320 जीपीयू ला सपोर्ट करतो.

वीडियो