PUBG म्हणजे PlayerUnknown’s Battlegrounds! हा फक्त एक गेम नाही तर वेड आहे. पबजी खेळणाऱ्यांचे निश्चित वय नाही, प्रत्येक वयोगटातील लोक या ऑनलाइन गेमचे फॅन आहेत. जेव्हा पबजी भारतात आला होता तेव्हा कुणालाच वाटले नव्हते कि हा गेम अशाप्रकारे डोकेदुखी ठरेल. फक्त भारतच नव्हे तर जगातील इतर देशांमध्ये पण पबजीचा ट्रेंड वाढतच आहे. भारतात वारंवार पबजी बॅन करण्याचा विषय समोर येत आहे तर शेजारी देश नेपाळ याच्या एक पाऊल पुढे गेला आहे आणि तिथे पबजी वर बॅनची घोषणा करण्यात आली आहे.
नेपाळ टेलीकम्यूनिकेशन्स अथॉरिटी (NTA) ने आपल्या देशात पबजी बॅन करण्याचा आदेश दिला आहे. एनटीए चे डिप्टी डायरेक्टर संदीप अधिकारी यांनी आपल्या विधानात म्हटले कि PUBG मध्ये हिंसक कंटेंट असल्यामुळे मुलांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडत आहे. डिप्टी डायरेक्टर यांनी Himalayan nation’s federal investigation authority यांच्या आग्रहानंतर काल म्हणजे गुरुवारी नेपाळच्या सर्व मोबाईल आपरेटर्स तसेच नेटवर्क सर्विस प्रोवाइडर्सना आदेश दिला आहे कि त्यांनी आपल्या नेटवर्क वर PUBG गेमची स्ट्रीमिंग ब्लॉक करावी. म्हणजे फोन मध्ये पबजी असूनही नेपाळ मधील लोक कोणत्याही वाईफाई किंवा डेटा प्लान मधून पबजी खेळू शकणार नाहीत.
पण आज बातमी लिहिताना जेव्हा आम्ही नेपाळ मध्ये राहणाऱ्या काही मित्रांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले कि त्यांच्या फोन मध्ये PUBG गेम अजूनही चालत आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या टेलीकॉम कंपन्यांचे नंबर आहेत आणि त्या सर्वांवर ते PUBG खेळू शकत होते. तसेच पबजी वर बॅन बद्दल बोलताना ते म्हणाले कि कोणत्याही गेम बॅन करणे कायमचे उत्तर असू शकत नाही. गेम बॅन करण्याऐवजी सरकारने PUBG खेळण्यासाठी काही दिशा निर्देश जाहीर करावेत आणि सर्व तरुणांनी त्याचे पालन करावे.
गुजरात मध्ये पण आहे बॅन
विशेष म्हणजे PUBG वर भारतातील अनेक शहरांमधून या बॅनची मागणी केली जात आहे. गुजरात सरकारने गेल्या 30 मार्चला या गेम वर प्रतिबंध लावला होता त्यांनतर PUBG खेळण्याच्या आरोपाखाली या राज्यातून 10 लोकांना अटक झाली आहे. या अटक सत्रानंतर PUBG गेम भारतात चालवणारी कंपनी टेसेंट इंडिया ने आपल्या प्लेयर्सच्या सपोर्ट मध्ये येऊन या गेम वरून बॅन काढण्याची मागणी पण केली आहे.
अनेक प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत
PUBG संबंधित अनेक गंभीर प्रकरणे देशातील अनेक भागांतून समोर आली आहेत. या महिन्याच्या सुरवातीला हैदराबाद मध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय युवा संभाशिव यांने पण आत्महत्या केली आहे. संभाशिव दहावीचा विध्यार्थी होता, तो परीक्षेच्या वेळी अभ्यास करण्याऐवजी पबजी खेळात होता. गेम खेळल्यामुळे त्याची आई त्याला ओरडली तेव्हा नाराज होऊन संभाशिवने आपल्या घरात फाशी लावून आत्महत्या केली.
त्याचप्रमाणे मुंबई मध्ये राहणाऱ्या एका 18 वर्षीय युवकाने आपल्या परिवारा कडून PUBG खेळण्यासाठी एका हाईएंड स्मार्टफोनची मागणी केली होती पण, घरच्यांनी फोन देण्यास नकार दिला. त्यांनतर युवकाने आत्महत्या केली. तसेच गेल्या महिन्यात गाजियाबाद मध्ये राहणाऱ्या दहावीचा एक विद्यार्थी या गेमसाठी आपला घर सोडून गेला. अशीच एक धक्कदायक घटना राजधानी दिल्ली मध्ये पण झाली होती जिथे वसंतपुर मधील PUBG खेळू न दिल्यामुळे एका मुलाने आपल्या आई वडिलांची हत्या केली होती.
