ऑनलाइन मोबाईल गेम पबजीची लोकप्रियता वाढत असताना तरुणांवर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. ते पाहता अनेक देशांनी या मोबाईल गेम वर बंदी आणली आहे. अलीकडेच नेपाळ मध्ये पबजी वर बॅन लावण्यात आला होता. पण नंतर नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने काठमांडू जिल्हा न्यायालयाच्या पबजी बॅन करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.
आता हा गेम इराक मध्ये बॅन करण्यात आला आहे. इराक सरकार ने मोबाईल गेम वर प्रतिबंध लावण्याच्या बाजूने वोट केले. फक्त पबजी च नाही तर अजूनही अनेक ऑनलाइन गेम्स साठी इराकच्या संसदेत वोटिंग झाली, ज्यात सदस्यांनी बॅनच्या बाजूने मतदान केले.
इराक मध्ये पबजी आणि इतर ऑनलाइन गेम्स बॅन बद्दल इराक सरकारने म्हटले कि हिंसेने भरलेला हा मोबाईल गेम देशाच्या संस्कृती, सुरक्षा आणि स्वास्थ्यासाठी चांगला नाही. सराकरनुसार त्यांचा देश युद्ध आणि आतंकवादशी संघर्ष करत आहे आणि पबजी सारख्या गेम्समुळे तरुण हिंसेकडे वळत आहेत.
याआधी नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने आपल्या अंतरिम आदेशात ऑनलाइन मोबाईल गेम पबजी वर बंदी न लावण्याचा आदेश दिला आहे. नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाने 11 एप्रिलला सर्व इंटरनेट सर्विस देणाऱ्या कंपन्यांना पबजी सर्वर वरील इंटरनेट ट्राफिक थांबवण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणाची सुनवाई करताना जस्टिस ईश्वर प्रसाद खाटीवाडा यांनी नेपाळ सरकार आणि संबंधित विभागाला नोटिस दिली आणि त्यांच्याकडे पबजी वर उत्तर मागितले. सोबत सुप्रीम कोर्टाने काठमांडू जिल्हा न्यायालयाच्या पबजी बॅन करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.
पबजी मुळे झालेल्या दुर्घटना
PUBG संबंधित अनेक गंभीर प्रकार भारतातील विविध भागांतून समोर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी हैद्राबाद मध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय युवक संभाशिव ने आत्महत्या केली. संभाशिव दहावीचा विध्यार्थी होता आणी परीक्षेच्या काळात अभ्यासाऐवजी पबजी खेळत होता. गेम खेळत असल्यामुळे त्याची आई त्याला ओरडली तेव्हा नाराज होऊन संभाशिव ने आत्महत्या केली.
अलीकडेच यूएई मध्ये 20 वर्षीय महिलेने आपल्या पतीशी PUBG खेळू न दिल्याने घटस्फोट मागितला. रिपोर्टनुसार महिला म्हणते कि तिला स्वतःच्या मर्जीनुसार मनोरंजन निवडण्याचे स्वातंत्र्य आहे आणि तिचा नवरा हा हक्क हिरावून घेत आहे.
