जगातील नंबर एक मोबाईल चिपसेट निर्माता कंपनी क्वालकॉम ने हॉन्गकॉन्ग मध्ये आयोजित 4जी/5जी समिट 2018 मध्ये आपला नवीन चिपसेट सादर केला आहे. खास बाब म्हणजे कंपनी ने यावेळी मिड रेंज चिपसेट जास्त पावरफुल बनवला आहे ज्यामुळे मोबाईल यूजर्स कमी किंमतीती येणाऱ्या फोन मध्ये पण चांगली गेमिंग अनुभवू शकतील. कंपनी ने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट सादर केली आहे जी खूप अडवांस असल्याचे बोलले जात आहे.
यावर्षी ऑगस्ट मध्ये कंपनी ने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट सादर केला होता आणि स्नॅपड्रॅगन 675 याचेच अपग्रेड वर्जन आहे. कंपनीचा दावा आहे कि नवीन चिपसेट खासकरून कॅमेरा, गेमिंग आणि एआई लक्षात ठेऊन बनवण्यात आला आहे आणि हा आधीपेक्षा खूप फास्ट पण आहे.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 11 नॅनो मिटर फॅब्रिकेशनचा वापर करून बनवण्यात आला आहे आणि कंपनीने यात आॅक्टाकोर; क्वाड कोर + क्वाड कोर प्रोसेसरचा वापर केला आहे. यात एक प्रोसेसर कोरयो 460 आहे जो 2.0 गीगाहट्र्ज आॅक्टाकोरला सपोर्ट करतो आणि हा कोर्टेक्स ए76 आर्किटेक्चर वर आधारित आहे. तसेच दुसरा प्रोसेसर कोर्टेक्स ए55 आर्किटेक्चर वर आधारित आहे जो 1.7गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड सह येतो. यासोबत कंपनी ने एड्रीनो 612जीपीयू इंटीग्रेटेड केला आहे.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट फुल एचडी+ रेजल्यूशनला सपोर्ट करू शकतो. तसेच हा बॅटरी इफिशियंट पण आहे. कपंनीचा दावा आहे कि हा चिपसेट जुन्या मॉडेलपेक्षा गेमिंग मध्ये 30 टक्के जास्त फास्ट आहे. तसेच यात 35 टक्के जास्त वेगवान ब्राउजिंग करता येईल.
विशेष म्हणजे कंपनीचा हा मिड रेंज प्रोसेसर 3 कॅमेरा मॉड्यूलला सपोर्ट करू शकेल. तसेच यात 2.5 एक्स वाइड एंगल पिक्चर सपोर्ट असेल आणि 48 मेगापिक्सल पर्यंतच्या कॅमेऱ्याचा यासोबत वापर करता येईल. स्पीड बद्दल बोलायचे तर यात 600एमबीपीएस पर्यंतचा डाउनलोडिंग स्पीड आणि 150एमबीपीएस पर्यंतच्या स्पीडने अपलोड करता येईल.
