Home बातम्या पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा

पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा

Highlights
  • Realme 11 series पुढील महिन्यात मेमध्ये लाँच होईल.
  • ही स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चीनमध्ये येईल.
  • यात तीन मोबाइल फोन लाँच केले जाऊ शकतात.

Realme 11 5G आणि Realme 11 Pro 5G फोन अलीकडेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर लिस्ट करण्यात आले होते. तसेच आज कंपनीनं ऑफिशियल माहिती देत खुलासा केला आहे की रियलमी 11 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे मे मध्ये लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चायनामध्ये एंट्री करेल जी नंतर भारतीय बाजारात येईल.

रियलमीनं पोस्टर शेयर करत Realme 11 series च्या लाँचची माहिती दिली आहे. पोस्टरमधून स्पष्ट झालं आहे की ही नंबर सीरीज मे मध्ये ऑफिशियल होईल. कंपनीनं सीरीजमधील मोबाइल फोन्सच्या नावांवरील पडदा मात्र हटवला नाही परंतु Realme 11 5G, Realme 11 Pro 5G आणि Realme 11 Pro Plus 5G लाँच केले जाऊ शकतात.

रियलमी 11 प्रो आणि प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स

वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार Realme 11 Pro 5G तसेच Realme 11 Pro+ 5G मध्ये 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा मोठा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलसह येईल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. प्रोसेसिंगसाठी रियलमी 11 प्रो आणि 11 प्रो प्लस दोन्ही मॉडेल्समध्ये मीडियाटेकचा नवीन डिमेनसिटी 7200 चिपसेट मिळू शकतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल Realme 11 Pro+ 5G मध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 8 मेगापिक्सलचा सेकंडरी तर 2 मेगापिक्सलची थर्ड कॅमेरा लेन्स मिळू शकते.

लीकनुसार, Realme 11 Pro 5G फोन पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच याच्या बॅक पॅनलवर 100 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनच्या अन्य लेन्सची माहिती अद्याप समोर आली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

रियलमी 11 प्रो 5जी बद्दल सांगण्यात आलं आहे की हा फोन चार मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो ज्यात बेस व्हेरिएंट 6जीबी रॅमला सपोर्ट करू शकतो. तसेच प्रो प्लसचे देखील 4 मेमरी व्हेरिएंट्स बाजारात येऊ शकतात. पावर बॅकअपसाठी Realme 11 Pro आणि Pro+ 5G दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.