रियलमी आपल्या 5G स्मार्टफोन पोर्टफोलियोला पुढे वाढवत आहे. कंपनीने आपल्या 13 सीरीज अंतर्गत realme 13 5G लाँच केला आहे. हा मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट, 50MP मेगापिक्सल रिअर कॅमेरा सेटअप, डायनॅमिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने 18 जीबी पर्यंत रॅम, 5000mAh बॅटरी सारखे दमदार फिचर्ससह सादर झाला आहे. याची सेल ऑनलाईन साईट फ्लिपकार्ट, ब्रँडची वेबसाईट आणि इतर रिटेल आईटलेटवर सुरु होईल. चला, पुढे तुम्हाला डिव्हाईसची किंमत आणि सर्व वैशिष्ट्ये सविस्तर सांगतो.
realme 13 5G ची किंमत आणि उपलब्धता
realme 13 5G भारतात दोन स्टोरेज मध्ये सादर करण्यात आले आहे. फोनच्या 8 जीबी +128 जीबी स्टोरेजची किंमत 17,999 रुपये आहे. तर दुसरा मॉडेल 8 जीबी +256 जीबी 19,999 रुपयांना आहे.
लाँच ऑफर अंतर्गत कंपनी 1,000 रुपयांचा कॅशबॅक फायदा पण प्रदान करत आहे. तसेच, या मोबाईलची सेल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, ब्रँडची वेबसाईट आणि इतर रिटेल आऊटलेटवर 6 सप्टेंबरपासून सुरु होईल.
realme 13 5G चे स्पेसिफिकेशन
डिझाईन
- ड्युअल-टोन फिनिश
- दोन कलर ऑप्शन
realme 13 5G ड्युअल-टोन फिनिश सह मागील बाजूस एक गोलाकार कॅमेऱ्यासह येतो. बॅक पॅनलवर कॅमेरा मॉड्यूलमध्ये सेन्सर आणि एक एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. तर फ्रंटला पंच होल कटआऊट डिझाईन आहे. हा दोन कलर डार्क पर्पल आणि स्पीड ग्रीन मध्ये लाँच झाला आहे.
डिस्प्ले
- 6.72 इंचाचा FHD+ डिस्प्ले
- 120Hz रिफ्रेश रेट
कंपनीने realme 13 5G मध्ये 6.72 इंचाचा मोठा एलसीडी एफएचडी प्लस डिस्प्ले प्रदान केला आहे, यावर युजर्सना 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 1500: 1 कंट्रास्ट रेश्यो, 580 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट मिळतो. हेच नाही तर फोनमध्ये आईज-कंफर्ट आणि डार्क मॉड सारखी सुविधा पण देण्यात आली आहे.
प्रोसेसर
- डायमेंसिटी 6300
- 2.4Ghz क्लॉक स्पीड
ब्रँड द्वारे या नवीन रियलमी डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट सादर करण्यात आली आहे. हा 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे. ज्याच्या मदतीने युजर्सना 2.4GHz पर्यंतची हाय क्लॉक स्पीड मिळते. तर ग्राफिक्ससाठी ब्रँडने ARM G57 MC2 जीपीयू लावला आहे.
स्टोरेज आणि रॅम
- 18GB पर्यंत डायनॅमिक रॅम
- 256 जीबी स्टोरेज
realme 13 5G फोनमध्ये शानदार स्पीड आणि कोणताही प्रकारचा डेटा सेव्ह करण्यासाठी 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. ब्रँडद्वारे फोनमध्ये 10GB डायनॅमिक रॅम टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने 18 जीबी पर्यंत रॅम पावर वापर केला जाऊ शकतो.
कॅमेरा
- 50 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा
- 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
कॅमेरा फिचर्स पाहता realme 13 5G ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असलेला आहे. यात युजर्सना 50 मेगापिक्सल Samsung S5KJNS चा प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल फोटो स्टॅबिलायजेशन टेक्नॉलॉजीसह मिळतो. त्याचबरोबर ब्रँडने FOV 89°; f/2.4; 3P 2 मेगापिक्सलचा मोनो कॅमेरा लेन्स लावली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोबाईलमध्ये युजर्सना f / 2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
बॅटरी आणि चार्जिंग
- 5000mAh बॅटरी
- 45 वॉट अल्ट्रा फास्ट चार्जिंग
realme 13 5G मोबाईलला चालवण्यासाठी यात मिळणारी बॅटरी पण खास आहे कारण 5000mAh साईजचा वापर करण्यात आला आहे. तर चार्जिंगसाठी 45 वॉट अल्ट्रा फास्ट टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे की युजर्स फोन सह जास्त वेळाचा बॅकअप सहज मिळवू शकतात.
इतर
- IP64 रेटिंग
- रेन वॉटर स्मार्ट टच फिचर
रियलमीचा नवीन मोबाईल पाणी आणि धूळीपासून वाचणाऱ्या IP64 रेटिंगसह येतो. यात युजर्सना रेन वॉटर स्मार्ट टच फिचर मिळेल. तसेच स्टीरियो स्पिकर, अँटीना ऐरे मॅट्रिक्स सिस्टम, 6 अॅक्सेस हायपर सेन्सेटिव्ह जायरोस्कोप सारखे फिचर्स पण आहेत. तर कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम 5G, 4G, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3 सारखे अनेक ऑप्शन मिळतील. फोनमध्ये कंपनीनं स्मार्ट फोटो, AI परफेक्ट शॉट, AI स्मार्ट लूक, AI गेमिंग नेटवर्क सारखे अनेक आर्टिफिशियल इंटेलिजेंस फिचर्स पण दिले आहेत.
ऑपरेटिंग सिस्टम
- अँड्रॉईड 14
- realme UI 5.0
ऑपरेटिंग सिस्टम पाहता realme 13 5G मध्ये ग्राहकांना अँड्रॉईड 14 सह कंपनीच्या realme UI 5.0 काला सपोर्ट मिळेल.
