Home बातम्या Realme 7 सीरीज लॉन्च नंतर दुसऱ्या दिवशी कंपनीने कमी केल्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती, जाणून घ्या नवीन किंमत

Realme 7 सीरीज लॉन्च नंतर दुसऱ्या दिवशी कंपनीने कमी केल्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती, जाणून घ्या नवीन किंमत

Realme V5

Realme ने कालच भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन सीरीज ‘ रियलमी 7’ सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन Realme 7 आणि Realme 7 Pro लॉन्च केले गेले आहेत. आर्कषक डिजाईन आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या हे स्मार्टफोन्स या महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना विक्रीसाठी उपलब्ध होतील. रियलमी 7 सीरीज बाजारात येताच कंपनीने रियलमी 6 सीरीजच्या आधीच्या Realme 6 आणि Realme 6i च्या किंमती कमी केल्या आहेत, ज्या नंतर हे दोन्ही फोन्स आधीपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येतील.

Realme 6 ची किंमत

रियलमी 6 स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर हा फोन इंडियन मार्केट मध्ये चार वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. आज झालेल्या कपातीनंतर फोनचा 4 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये आणि 8 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

या प्राईस कटच्या आधी Realme 6 चा 4 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 64 स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये, 6 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये आणि 8 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकला जात होता.

रियलमी 6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Realme 6i ची किंमत

रियलमी 6आई पाहता हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. प्राईस कटनंतर फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपये तर 6 जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विका घेता येईल.

रियलमी 6आई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Realme 7

कालच भारतात लॉन्च झालेली रियलमी 7 सीरीज पाहता बेस मॉडेल म्हणजे Realme 7 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात छोटा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपये तर 8 जीबी रॅम वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

Realme 7 Pro

रियलमी 7 प्रो ने पण इंडियन मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये एंट्री घेतली आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. तसेच फोनच्या मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे. जो 21,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

Realme 7 येत्या 10 सप्टेंबर पासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वर विक्रीसाठी उपलब्ध होईल तर Realme 7 Pro ची विक्री येत्या 21 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वरून होईल. दोन्ही फोन्स लवकरच ऑफलाइन स्टोर्स वर पण विकले जातील. या दोन्ही फोन्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

Realme 7 / Realme 7 Pro

रियलमी 6 वीडियो