Home बातम्या 64MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर सह लॉन्च झाला Realme 6, आहे का Redmi Note 8 पेक्षा चांगला?

64MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर सह लॉन्च झाला Realme 6, आहे का Redmi Note 8 पेक्षा चांगला?

Realme 6 सीरीज आज सादर करण्यात आली आहे. कंपनीने नवीन स्मार्टफोन सीरीज मध्ये Realme 6 आणि Realme 6 Pro हँडसेट होल-पंच डिजाइन आणि 90 हर्ट्ज डिस्प्ले सह सादर केले आहेत. हे प्रोडक्ट कंंपनीने एका ऑनलाइन इवेंटच्या माध्यमातून लॉन्च केले आहेत. कोरोनावायरसची वाढती भीती पाहता Realme ने लोकांसमोर होणारा इवेंट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीने या सीरीज सोबत Realme Band पण सादर केला आहे.

किंमत आणि विक्री

Realme 6 कंपनीने तीन रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. रियलमी 6 च्या 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये, 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. या डिवाइसची विक्री कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळ आणि फ्लिपकार्ट सह ऑफलाइन स्टोर्स वर 11 मार्चला दुपारी 12 वाजता सुरु होईल.

डिजाइन

Realme 6 कंपनीने होल-पंच डिस्प्ले सह सादर केला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर मोठी स्क्रीन आहे, ज्याच्या तिन्ही बाजूनं खूप कमी बेजल्स आहेत. तर खालच्या बाजूला जाड बेजल्स दिसतात. डिस्प्ले वर उजवीकडे पंच होल देण्यात आला आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. रियलमी 6 मध्ये उजवीकडे साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे जो पावर ऑन-ऑफचे काम करतो. तर डावीकडे वॉल्यूम रॉकर बटण आणि सिम ट्रे आहे. डिवाइसचा बॅक पॅनल पॉली कार्बोनेटचा बनला आहे, ज्यात डावीकडे क्वाड कॅमेरा सेटअप आणि त्यासोबत एलईडी फ्लॅश लाइट आहे. Realme 6 च्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे.

दमदार कॅमेरा

स्मार्टफोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 8-मेगापिक्सलचा वाइड अँगल सेंसर एफ/2.3 अपर्चर, 64-मेगापिक्सलचा मेन सेंसर एफ/1.8 अपर्चर, 2-मेगापिक्सलचा मोनो सेंसर एफ/2.4 अपर्चर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस एफ/2.4 अपर्चर सह मिळते. तसेच फोन मध्ये 10एक्स डिजिटल झूम क्षमता आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा सॅमसंग सेंसर आहे. फ्रंटला यूजर्सना नाइटस्केप मोड मिळणार नाही. पण मागे ब्यूटी, फिल्टर, एचडीआर, पॅनारॉमिक व्यू, पोर्टेट आणि टाइमलॅप्स मोड आहेत.

स्पेसिफिकेशन्स

रियलमी 6 प्रो प्रमाणे Realme 6 मध्ये पण 90 हर्ट्ज डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले 90.5% स्क्रीन टू बॉडी रेश्यो आणि कोर्निंग ग्लास गोरिल्ला सह देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये मीडियाटेक हीलियो जी 90 टी ऑक्टाकोर प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम, 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम सह 64जीबी व 128जीबी इंटरनल स्टोरेजचे पर्याय देण्यात आले आहेत.

तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30 वॉट फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी सह येते. सोबतच फोन चार्ज करण्यासाठी बॉटमला टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. फोन Comet white आणि comet blue कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.