Home बातम्या रियलमीचा स्वस्त 5जी फोन Realme 7 5G या दिवशी करेल एंट्री, असे असतील फीचर्स

रियलमीचा स्वस्त 5जी फोन Realme 7 5G या दिवशी करेल एंट्री, असे असतील फीचर्स

Realme V5

रियलमी बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर येत होती थी कि कंपनी स्वस्त 5जी फोन Realme 7 5G लॉन्च करणार आहे, ज्याच्या किंमतीची माहिती एका लीकच्या माध्यमातून समोर आली होती. आता कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि फोन 19 नोव्हेंबरला यूकेच्या मार्केट मध्ये सादर केला जाईल. हा स्मार्टफोन रियलमीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Realme 7 series चा आगामी मॉडेल आहे, जो 5जी वेरियंट मध्ये मार्केट मध्ये येईल.

UK मध्ये Realme 7 5G 19 नोव्हेंबरला 10 AM GMT (3:30 PM IST) वाजता सादर केला जाईल. या दिवशी “real deal 5G event” चे आयोजन करण्यात येईल, ज्यात फोन सादर केला जाईल. कंपनी हा इवेंट लाइव स्ट्रीम करेल. Realme 7 5G च्या स्पेसिफिकेशन आणि डिजाइन बद्दल बोलले जात आहे कि हा Realme V5 सारखाच असेल जो यावर्षी ऑगस्ट मध्ये चीन मध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच Realme 7 5G ला काही दिवसांपूर्वी मॉडेल नंबर RMX2111 सह NBTC सर्टिफिकेशन मिळाले होते.

संभावित किंमत

रियलमीने अधिकृतपणे या स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती दिली नाही, पण अलीकडेच टिप्स्टर अभिषेक यादवने माहिती दिली होती कि या फोनच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,499 युआन (जवळपास 17,000 रुपये) असेल. तसेच रियलमी 7 5जी चा 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरियंट 1,899 युआन (जवळपास 21,400 रुपये) चा असेल.

हे देखील वाचा : Realme X7 सीरीज लवकरच होईल भारतात लॉन्च, वेबसाइट वर लिस्ट झाले स्मार्टफोन्स

स्पेसिफिकेशन्स

रियलमी 7 5जी चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.5-इंचाचा होल पंच डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90-हार्ट्ज असू शकतो. या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 720 SoC प्रोसेसर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच यात 5,000mAh ची बॅटरी असेल, जी फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल.