Realme ने या महिन्याच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपली नवीन ‘रियलमी 7’ सीरीज सादर केली होती. या सीरीज अंतगर्त Realme 7 आणि Realme 7 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते. आज अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये या सीरीजच्या अजून एका नवीन स्मार्टफोनने Realme 7i नावाने एंट्री घेतली आहे. हा फोन पण पंच-होल डिस्प्ले आणि 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह मिड बजेट सेग्मेंट मध्ये आला आहे जो सध्या इंडोनेशिया मधेच विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Realme 7i
रियलमी 7आय चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन पी2आय कोटेड केली गेली आहे जी वॉटर प्रूफ आहे आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. डिस्प्लेच्या डावीकडे पंच-होल आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे.
Realme 7i अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो रियलमी यूआय सह चालतो काम करतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा नवीन रियलमी फोन एड्रेनो 610 जीपीयू ला सपोर्ट करतो. हा फोन 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रियलमी 7आय क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा B&W सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.1 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या Sony IMX471 सेंसरला सपोर्ट करतो.
Realme 7i डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 7आय मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. इंडोनेशिया मध्ये हा फोन Aurora Green आणि Polar Blue कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत 15,900 रुपयांच्या आसपास आहे.
