मोबाईल सेग्मेंटबद्दल Realme खूप ऍक्टिव्ह दिसत आहे. कंपनीने आत्ताच Narzo 30A आणि Narzo 30 Pro लॉन्च केले होते. तर आज Realme 8 सीरीजचा टीजर जारी केला आहे. कंपनीने अधिकृतपणे या फोनचे नाव घेतले नाही पण रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी एक पोस्टर ट्विट केला आहे ज्यात 108 MP कॅमेरयाच उल्लेख केला आहे आणि हॅशटॅग मध्ये इनफिनाइट लीप विथ 8 (InfiniteLeapWith8) असे म्हटले आहे. त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच आपली नवीन Realme 8 सीरीज सादर करणार आहे. (realme 8 series to launch in india with108 mp camera)
जसे कि आतापर्यंतच्या मॉडेल मध्ये दिसले आहे कि कंपनी दोन मॉडेल घेऊन येते. त्यामुळे आशा आहे कि यावेळी पण Realme 8 सह Realme 8 Pro येऊ शकतो.
A great breakthrough ahead!
Do you guys know what 108 stands for?
Stay tuned, unveiling tomorrow.#InfiniteLeapWith8 #DareToLeap pic.twitter.com/fD8B3WFHOd— Madhav FutureX (@MadhavSheth1) February 25, 2021
Realme 8 मध्ये असेल 108 Megapixel चा कॅमेरा
जानेवारी मध्ये Xiaomi Mi 10i आय भारतात सादर केला गेला होता आणि हा फोन अपनी 5G सह 108 MP च्या कॅमेऱ्यामुळे खूप चर्चेत राहिला होता. तसेच आता या सेग्मेंट मध्ये रियलमी येणार आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे कि आगामी Realme 8 सीरीज मध्ये 108 MP चा कॅमेरा असेल.
कंपनीने जो फोटोग्राफी शेयर केला आहे त्यात चौकोनी स्टाइल मध्ये कॅमेरा ब्रॅकेट आहे आणि त्यात चार कॅमेरा देण्यात आले आहेत. त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल.
Realme 8 चे स्पेसिफिकेशन
कंपनीने आतापर्यंत कोणतीही खास माहिती दिली नाही पण गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये Realme 8 बेंचमार्क साइट Geekbench वर लिस्ट झाला होता. त्या लिस्टिंग मध्ये काही स्पेसिफिकेशनची माहिती आली होती.
लिस्ट करण्यात आलेल्या फोनचा मॉडेल नंबर RMX3092 होता आणि हा फोन Android OS 10 वर चालत होता. तसेच 8 GB RAM ची माहिती देण्यात आली होती. तसेच हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 720 (MediaTek Dimensity 720) ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालत होता.
हा टेस्टिंग फोन असू शकतो कारण कंपनी आता आपला नवीन फोन Android 11 वर लॉन्च करेल. गीकबेंच व्यतिरिक्त Realme 8 मॉडेल (RMX3092) ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) वेबसाइटवर पण दिसला होता. हा Realme 8 असू शकतो पण Realme 8 Pro प्रोसेसर आणि कॅमेराच्या बाबतीत खूप अडवांस असेल. कदाचित 108 MP कॅमेरा Realme 8 Pro मधेच मिळू शकतो.
