Home बातम्या 5,000mAh बॅटरी सह लॉन्च झाला स्वस्त Realme C11, जाणून घ्या संपूर्ण माहिती

5,000mAh बॅटरी सह लॉन्च झाला स्वस्त Realme C11, जाणून घ्या संपूर्ण माहिती

रियलमीने आज एक नवीन स्मार्टफोन Realme C11 लॉन्च केला आहे. कंपनीने हा नवीन डिवाइस ‘C’ सीरीज मध्ये मलेशिया मध्ये सादर केला आहे. आशा आहे कि हा लवकरच भारतात पण लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने या डिवाइसच्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. Realme चा नवीन बजेट स्मार्टफोन काही कारणास्तव ब्रँडच्या आधीच्या फोन्स पेक्षा वेगळा आहे जसे कि फोनची कॅमेरा सेटअप डिजाइन. तसेच हा फोन कंपनीचा पहिला डिवाइस आहे जो मीडियाटेक Helio G35 वर चालतो. चला जाणून घेऊया फोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती.

डिजाइन

फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर हा Realme चा पहिला फोन आहे जो चौकोनी डिजाइन कॅमेरा सेटअप सह आला आहे. फोनच्या मागे डावीकडे चौकोनी डिजाइन कॅमेरा सेटअप आहे, ज्यात दोन रियर कॅमेरे आणि फ्लॅश लाइट आहे. तसेच या कॅमेरा सेटअपच्या मध्ये कंपनीची ब्रँडिंग आहे. फोनच्या फ्रंट लुक बद्दल बोलायचे तर हा मिनी-ड्रॉप नॉच डिस्प्ले सह येतो. फोनच्या टॉप आणि फोन स्क्रीनच्या उजवीकडे आणि डावीकडे खूप कमी बेजल्स देण्यात आले आहेत. हँडसेटच्या स्क्रीन खाली खूप जाड बेजल्स आहेत. हँडसेटच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आली आहे. फोन मध्ये उजवीकडे वॉल्यूम आणि पावर ऑन-ऑफ बटण व डावीकडे सिम ट्रे आहे.

स्पेसिफिकेशन्स

Realme C11 बद्दल बोलायचे तर यात 6.5-इंचाचा मिनी-ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो HD+ (1600×720) रिजोल्यूशन सह येतो. फोन मध्ये 2.3GHz मीडियाटेक हीलियो G35 गेमिंग चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट हाइपरइंजन टेक्नोलॉजी आणि IMG PowerVR GE8320 जीपीयू सह येतो. Realme C11 मध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी यूजर माइक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवू शकतात.

फोटोग्राफी पाहता Realme C11 मध्ये मागे डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 13MP प्राइमरी सेंसर आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी सी11 ट्रिपल कार्ड स्लॉटला सपोर्ट करतो. याचा अर्थ असा आहे की फोन मध्ये दोन सिम सह एक माइक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh battery आणि फोन एंडरॉयड 10 बेस्ड रियलमी यूआई वर चालतो.

किंमत आणि उपलब्धता

Realme C11 मलेशिया मध्ये RM 429 (जवळपास 7,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. डिवाइस दोन कलर ऑप्शन Mint Green आणि Pepper Grey मध्ये येतो. तर Realme C11 7 जुलै पासून ई-कॉमर्स साइट Lazada वर उपलब्ध होईल. इंडिया लॉन्च बद्दल अजूनतरी अधिकृत माहिती आलेली नाही.