Home बातम्या फक्त 7,499 रुपयांमध्ये लो बजेट Realme C30s लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी

फक्त 7,499 रुपयांमध्ये लो बजेट Realme C30s लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी

खूप कमी कालावधीत रियलमीनं खूप जास्त लोकप्रियता कमावली आहे. तरुणाईमध्ये कंपनीचे स्मार्टफोन खूप लोकप्रिय असण्याचं कारण म्हणजे रियलमी कमी किंमतीती शानदार स्मार्टफोन सादर करते. आता पुन्हा एकदा Realme नं आपल्या लो बजेट फोन्सचा पोर्टफोलियो वाढवत एक नवीन मोबाइल लाँच केला आहे. कंपनीच्या सी सीरिजमध्ये नवीन Realme C30s ची एंट्री झाली आहे. या रियलमी स्मार्टफोनची खासियत पाहता यात 6.5-इंच HD+ डिस्प्लेसह Octa Core प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी आहे. चला या लेखातून Realme C30S च्या किंमत, सेल डेट आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेऊया.

Realme C30S Price आणि Sale

Realme C30s स्मार्टफोनचे कंपनीनं दोन रॅम व स्टोरेज मॉडेल भारतात सादर केले आहेत. या हँडसेटच्या 2GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येणार मोठा व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध होईल. बजेट फ्रेंडली Realme C30s स्मार्टफोनची विक्री 23 सप्टेंबर रात्री 12 वाजल्यापासून सुरु केली जाईल. फोनमध्ये स्ट्राइप ब्लू आणि स्ट्राइप ब्लॅक कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.

Realme C30S चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता रियलमी सी30एस मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये Octa Core प्रोसेसर आहे, जोडीला 2GB आणि 4GB RAM सोबतच 32GB आणि 64GB स्टोरेज मिळते. Realme C30s ची स्टोरेज वाढवण्यासाठी कंपनीनं मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी सी30एस फोनच्या मागे एकच 8MP चा AI कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला एलईडी फ्लॅश देखील आहे. तर फ्रंटला सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा कॅमेरा मिळतो. रियर कॅमेरा मधील फीचर्स पाहता Beauty, Filter, HDR, Panoramic View, Portrait, Timelapse, Expert, Super Night सारखे मोड्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: धक्कादायक! साध्या फिचर फोनमध्ये झाला Blast; उत्तरप्रदेशमध्ये 8 महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रियलमी सी30एस फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच या फोनमध्ये डिवाइसमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.