रिअलमी ने जागतिक बाजारपेठेत आपल्या सी-सीरीजचा विस्तार केला आहे. या अंतर्गत Realme C65s मोबाईल व्हिएतनाममध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना एआय कॉल नॉईज रिडक्शन, 45 वॉट सुपरव्हीओओसी फास्ट चार्जिंग, 5000 एमएएच बॅटरी, 6.74 इंचाचा मोठा डिस्प्ले, एक्सपॅंडेबल तंत्रज्ञानाच्या मदतीने 16 जीबी पर्यंत रॅम यांसारखे अनेक फिचर्स देण्यात आली आहेत. चला, पुढे किंमत आणि वैशिष्ट्ये याबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.
Realme C65 चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Realme C65s स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा आयपीएस एलसीडी आय प्रोटेक्शन डिस्प्ले मिळत आहे. हे एचडी+ स्क्रीन रिझोल्यूशन, 560 निट्स ब्राईटनेस, 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 180 हर्ट्झ पर्यंत टच सॅम्पलिंग रेट प्रदान करण्यास सक्षम आहे.
- प्रोसेसर: Realme C65s मोबाईल फोनमध्ये ब्रँडने परफॉर्मन्ससाठी एन्ट्री लेव्हल युनिसोक टी612 प्रोसेसर दिला आहे त्याला ग्राफिक्ससाठी माली-जी57 जीपीयू सह जोडले गेले आहे.
- स्टोरेज आणि रॅम: Realme C65S मध्ये स्पीड आणि स्टोरेजसाठी 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजची आहे. एवढेच नाही तर ह्यात 8 जीबी एक्सपॅंडेबल रॅम देखील देण्यात येत आहे. ज्यामुळे 16 जीबी पर्यंतच्या रॅमचा वापर केला जाऊ शकतो.
- कॅमेरा: कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास मागील पॅनलवर एआय ने सुसज्ज असा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सेलची प्रायमरी लेन्स आहे. हा कॅमेरा नाईट शॉट, पॅनोरामा, पोर्ट्रेट, टाईम-लॅप्स पोर्ट्रेट, स्लो मोशन, क्यूआर कोड स्कॅनिंग, गुगल लेन्स आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी 480p@30fps, 720p@30fps, 1080p@30fps ला सपोर्ट करतो.
- बॅटरी आणि चार्जिंग: पॉवर बॅकअपसाठी डिव्हाईसमध्ये 5000 एमएएच ची मोठी बॅटरी लावली गेली आहे, ती जलद चार्ज करण्यासाठी सुपरवूक 45 वॉट फ्लॅश चार्जचा सपोर्ट दिला गेला आहे.
- इतर: इतर वैशिष्ट्यांमध्ये IP54 वॉटर रेझिस्टन्स रेटिंग, टीयूव्ही राईनलँड रेटिंग, एआय कॉल नॉईज रिडक्शन, 4 वर्षांपर्यंत स्मुथ प्रदर्शन, ड्युअल नॅनो सिम स्लॉट, 4G, वायफाय 5, ब्लूटूथ 5.0, 3.5एमएम ऑडिओ जॅक, युएसबी टाईप-सी पोर्ट, आणि मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळत आहे.
- ऑपरेटिंग सिस्टम: Realme C65s मोबाईल अँड्राईड 14 आधारित रिअलमी युआय सोबत मिळून काम करतो.
- वजन आणि डायमेन्शन: Realme C65s फोनचे डायमेन्शन 167.26×76.67×7.74 मिमी आहे आणि त्याच्या एमराल्ड ग्रीनचे वजन 189 ग्रॅम आणि रॉयल ब्लूचे वजन 191 ग्रॅम आहे.
Realme C65s ची किंमत
- Realme C65s स्मार्टफोन व्हिएतनामच्या अधिकृत वेबसाईटवर सूचीबद्ध झाला आहे. हा तीन स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 6 जीबी + 128 जीबी ची किंमत 4,290.000 VND म्हणजेच सुमारे 14,500 रुपये आहे.
- मिड मॉडेल 8 जीबी + 128 जीबी मेमरी 4,790.000 VND म्हणजे सुमारे 16,000 रुपये आणि टॉप व्हेरिएंट 8 जीबी + 256 जीबी 5,290.000 VND म्हणजे सुमारे 18,000 रुपये आहे.
