स्मार्टफोन्सच्या जगात अजून एक नवीन बदल येणार आहे. लवकरच एका फोन मधून 64-मेगापिक्सलचा फोटो क्लिक करता येईल. गेल्या काही आठवड्यांपासून Samsung आणि Xiaomi सारख्या मोठ्या कंपन्यांबद्दल बातमी समोर आली होती कि या दोन्ही कंपन्या असा स्मार्टफोन बनवत आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. या बातम्या अजूनतरी लीक्स मध्ये समोर येत होत्या. पण आता Samsung आणि Xiaomi च्या आधी टेक कंपनी Realme ने लीक्सच्या पुढे जात 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन सादर पण केला आहे.
Realme CEO माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून ट्वीट करत कंपनीच्या 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन समोर आणला आहे. माधव सेठ यांनी आपल्या ट्वीट मध्ये एक फोटो शेयर केला आहे जो 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मधून घेतला गेला आहे. हा एक लँडस्केप फोटो आहे ज्यात 64MP AI Quad Camera कॅमेऱ्यासह Shot on realme लिहिले आहे. हा फोटो शेयर कारण्यासोबतच माधव सेठ यांनी घोषणा केली आहे कि कंपनी नवीन प्रीमियम किलर फोन वर काम करत आहे.
Working on the new premium killer! Introducing world's first smartphone camera with 64MP GW1 largest 1/1.72” sensor and mega 1.6µm pixel with amazing clear shots in low light too. RT if you want to see more “knockout” shots. #DareToLeap pic.twitter.com/D54xNFdaVm
— Madhav 5G (@MadhavSheth1) June 24, 2019
64-मेगापिक्सल वाला फोटो शेयर करण्यासोबतच माधव यांनी आपल्या ट्वीट मध्ये सांगितले आहे कि कंपनी जगातील पहिल्या 64-मेगापिक्सल कॅमेरावाल्या फोन वर काम करत आहे. हा स्मार्टफोन 1/1.72” sensor आणि mega 1.6µm pixel वाल्या 64MP GW1 ला सपोर्ट करेल. आपल्या ट्वीट मध्ये रियलमी सीईओ ने 64-एमपी क्वॉलिटी वाला फोटो शेयर करण्यासोबत ‘Dare to Leap’ टॅगलाईनची सुरवात केली आहे.
विशेष म्हणजे Samsung ने अलीकडेच ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी दाखवली होती. या टेक्नॉलॉजी सह कोणताही स्मार्टफोन 64-मेगापिक्सल पर्यंतचे फोटो कॅप्चर करू शकतो. विशेष म्हणजे हे रेज्ल्यूशन आता पर्यंत जगात लॉन्च झालेल्या कोणत्याही स्मार्टफोन पेक्षा खूप जास्त आहे.
64-एमपी कॅमेरा असे करेल काम
सॅमसंग द्वारा सादर करण्यात आलेली नवीन ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी pixel-merging Tetracell technology आणि remosaic algorithm च्या समन्वयाने बनली आहे. या दोन एडवांस टेकनॉलॉजी एकत्रित करून सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर लो लाईट मध्ये 16-मेगापिक्सलचे फोटो क्लिक करतो. हा सेंसर 16-मेगापिक्सल वर एक साथ 4 फोटो कॅप्चर करतो आणि चार वेगवेगळ्या फोटो फाइल्सला मिळून 64-मेगापिक्सलची एक फोटो फाईल बनवतो.
सोबतच ISOCELL Bright GW1 कॅमेरा सेंसर 100-डेसीबल (dB) पर्यंतच्या रियल टाईम हाई डायनामाइक रेंज (HDR) ला पण सपोर्ट करतो. त्यामुळे फोन मधून घेतलेला फोटो खूप उच्च श्रेृणीचा ह्यू देतो आणि कॅप्चर केलेल्या फोटो मधील सर्व रंग स्पष्ट आणि शार्प दिसतात. Samsung ची हि कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी डुअल कन्वर्शन गेन (DCG) सहा येते जी कॅमेरा मध्ये येणार प्रकाश इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलते.
असे असतील खास फीचर्स
सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलून हा प्रकाश फुल वॅल कॅपॅसिटी (FWC) द्वारे ऑप्टिमाइज करून फोटो संतुलतीपणे ब्राइट करतो. या कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी मुळेच Xiaomi किंवा Samsung चा आगामी स्मार्टफोन 480fps स्पीड वर फुल एचडी स्लो-मोशन वीडियो घेऊ शकेल. सोबतच स्मार्टफोन हाई परफॉर्मेंस फेज डिटेक्शन आटो फोकस टेक्नॉलॉजी (Super PD) सारख्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह येईल.
माधव सेठ द्वारा हा फोटो शेयर केला गेल्या नंतर एकीकडे स्पष्ट झाले आहे कि Realme कंपनी 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या फोनची निर्मिती करत आहे तर दुसरीकडे असे पण म्हणता येईल कि हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये पण येईल. आता रियलमीने बाजी मारल्यानंतर Xiaomi किंवा Samsung काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
