टेक कंपनी रियलमी आपला अपकमिंग फोन Realme GT (जो आधी Realme Race नावाने ओळखला जात होता) 4 मार्चला लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. बाजारात येण्याआधी फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 5G चे दोन पोस्टर कंपनीने रिलीज केले आहेत. पोस्टर मध्ये फोनची मागील डिजाइन दाखवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर लुकसह पोस्टर मध्ये खुलासा झाला आहे कि फोन मध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. तसेच एका रियलमी जीटी बॅनरवर MWC शंघाई पण दिसत आहे. विशेष म्हणजे चीनच्या शंघाई मध्ये 23 फेब्रुवारीपासून मोबाईल वर्ल्ड कांग्रेसची सुरुवात होणार आहे. (Realme gt 5g confirmed to feature 64 megapixel triple rear camera and design launch on 4 march)
डिजाइन
अधिकृत Realme GT पोस्टर पाहता यात दाखवण्यात आले आहे कि हँडसेटच्या खालच्या भागावर लाउडस्पीकर, एक यूएसबी-C पोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. त्याचबरोबर पावर बटन फोनच्या डावीकडे दिसत आहे. तुम्हाला ऑडियो बटन खूप प्रयत्न केल्यावर दिसतो कारण तो फोनच्या डावीकडे देण्यात आला आहे. Realme GT च्या मागे आयताकृती कॅमेरा सेटअप एका लांब एलईडी मॉड्यूलसह दिसतो. पण रेंडर मध्ये कॅमेरा बम्प दिसत नाही.
हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10 सीरीज भारतात होईल 4 मार्चला लॉन्च, दमदार फीचर्ससह Realme ला देईल आव्हान
स्पेसिफिकेशन्स
Realme GT 5G मध्ये फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट दिला जाईल. याआधी आलेल्या लीकमधून समजले होते कि सेल्फी कॅमेऱ्यासाठी फोन एक पंच-होल डिजाइनसह AMOLED डिस्प्ले पण असेल. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे तर फोन मध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असू शकते. तसेच, अपकमिंग Realme फोन पण 12GB रॅमसह सादर केला जाऊ शकतो.
प्रो वर्जन पण होऊ शकतो लॉन्च
अफवा अशी आहे कि रियलमी या फोनचा एक प्रो वर्जन पण लॉन्च करू शकते. प्रो वेरिएंट मध्ये 160Hz रिफ्रेश रेटसह स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 125 वॉट अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा : 24 फेब्रुवारीला होईल Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A ची भारतात एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या या फोन्सबाबत सर्वकाही
टेना लिस्टिंग
अलीकडेच या फोनचा मॉडेल नंबर RMX2202 सह TENAA आणि 3C सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. वेबसाइटनुसार हा मॉडेल नंबर असलेला डिवाइस कंपनी चीनमध्ये रियलमी GT 5G नावाने लॉन्च करेल. TENAA लिस्टिंगमध्ये हा फोन पंच-होल डिजाइन डिस्प्ले, आयताकृती कॅमेरा मॉड्यूलसह दिसला होता.
