Home बातम्या Realme नं भारतात लाँच केला GT Neo 3T 5G Phone; 80W फास्ट चार्जिंगसह 64MP कॅमेरा

Realme नं भारतात लाँच केला GT Neo 3T 5G Phone; 80W फास्ट चार्जिंगसह 64MP कॅमेरा

Realme GT Neo 3 5G Phone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

गेले काही दिवस रियलमी भारतात बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करत आहे. परंतु आता कंपनीनं शक्तिप्रदर्शन करत मिडरेंजमध्ये नवीन स्मार्टफोन Realme GT Neo 3T 5G लाँच केला आहे. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येणारा हा रियलमी फोन थेट OnePlus शी भिडणार आहे. रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोन 120Hz AMOLED Display, 64MP Triple Rear Camera, Snapdragon 870 5G चिपसेट आणि 80W Superdart Charge सह बाजारात आला आहे, ज्याची संपूर्ण माहिती आम्ही पुढे दिली आहे.

Realme GT Neo 3T 5G Specifications

Realme GT Neo 3T 5G Display

रियलमी जीटी नियो 3टी कंपनीनं 1080 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.62 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच आहे. फोनची स्क्रीन Samsung E4 AMOLED पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा रियलमी मोबाइल 1300निट्स ब्राइटनेस, 397पीपीआय, आणि 106 एनटीएससी सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. हे देखील वाचा: रेडमीला बाजारातून हद्दपार करण्यासाठी रियलमी सज्ज; फक्त 7,499 रुपयांमध्ये लो बजेट Realme C30s लाँच

Realme GT Neo 3T 5G Camera

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 3टी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि एक 2 मेगापिक्सल 4सीएम मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme GT Neo 3T 5G Processor

रियलमी जीटी नियो 3टी अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 5जी चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 3.1 Storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये एड्रेनो 650 जीपीयू आहे.

Realme GT Neo 3T 5G Battery

पावरफुल स्पेसिफिकेशन्स सोबतच या रियलमी मोबाइल फोनमधील बॅटरी देखील दमदार आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीचा दावा आहे की हा मोबाइल फोन फक्त 12 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. तसेच स्मार्ट मल्टी आयसी चिप फोन बॅटरी हीट होऊ देत नाही व थंड ठेवते. हे देखील वाचा: 5000mAh Battery असलेला Realme चा स्वस्त स्मार्टफोन लाँच; पहिल्याच सेलमध्ये ऑफर्सचा वर्षाव

Realme GT Neo 3T 5G Price

रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस 29,999 रुपये आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह 31,999 रुपये तर सर्वात मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह 33,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. Realme GT Neo 3T 5G 23 सप्टेंबरपासून Dash Yellow, Drifting White आणि Shade Black कलरमध्ये विकत घेता येईल.