Home बातम्या अगदी नव्या सारखे होतील रियलमीचे फोन; पाहा Android 13 Update मिळणाऱ्या स्मार्टफोनची संपूर्ण यादी

अगदी नव्या सारखे होतील रियलमीचे फोन; पाहा Android 13 Update मिळणाऱ्या स्मार्टफोनची संपूर्ण यादी

Realme Mobile Phone Android 13 Update Roadmap Complete List

Realme Mobile Phone युजर्सना आता लवकरच अगदी नवीन आणि अ‍ॅडव्हान्स अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम मिळणार आहे. आता सर्व रियलमी स्मार्टफोन्समध्ये Android 13 Update येत आहे आणि कंपनीनं संपूर्ण रोडमॅप देखील शेयर केला आहे. क्रमाक्रमाने वेगवेगळ्या तारखेला रियलमी मोबाइल फोन्समध्ये अँड्रॉइड 13 अपडेट जारी केली जाईल. जर तुम्ही देखल रियलमी मोबाइल वापरत असाल तर पुढील लिस्टमध्ये पाहू शकता की कधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 13 डाउनलोड व इन्स्टाल करू शकाल.

Realme Mobile phone Android 13 update roadmap complete list:

तुम्ही पाहू शकता की रियलमी जीटी सीरीजला या महिन्यात अँड्रॉइड 13 अपडेट मिळणार आहे आणि पुढील महिन्यात रियलमी 9 प्रो सीरीजचा नंबर येईल. रियलमी नारजो 50 स्मार्टफोन्स नोव्हेंबरमध्ये तसेच रियलमी 9 सीरीजचे बहुतांश फोन पुढील वर्षीच्या सुरुवातीला अँड्रॉइड 13 वर अपडेट होतील. लो बजेट रियलमी सी सीरीजला साल 2023 च्या तिसऱ्या तिमाहीतच Android 13 Update मिळेल.

Android 13 डाउनलोड व इन्स्टाल करण्याची पद्धत

1. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Android 13 OTA update आला आहे की नाही ते चेक करण्यासाठी Settings ओपन करा.
2. सेटिंग्स मेन्यूमधील System ऑप्शनवर जा.
3. इथे System update बटनवर क्लिक करा. जर अँड्रॉइड 13 ओटीए तुमच्या फोनवर आला असेल तर तुम्हाला फाईल दिसेल.
4. या नवीन अपडेटवर टॅप करताच तुमच्या फोन फाइल डाउनलोड करू लागेल.
5. फाइल इन्स्टाल होताच तुमचा स्मार्टफोन ऑटो-बूट होईल, त्यानंतर ऑन होताच तुमचा मोबाइल फोन अगदी नवीन Android OS वर काम करू लागेल.

Android 13 व्हर्जन तुमच्या फोनमध्ये डाउनलोड व इन्स्टाल करण्याआधी डिवायसचा बॅकअप घेणं केव्हाही चांगलं. तसेच संपूर्ण प्रोसेस फॉलो करण्याआधी फोनची बॅटरी देखील चार्ज करावी.