Categories: बातम्या

realme NARZO 70x 5G भारतातील लाँचची तारिख झाली कंफर्म, 12 हजारामध्ये मिळेल 45W Charging आणि 50MP Camera

रियलमीने अलीकडेच भारतात आपल्या नवीन ‘पी’ सीरिजची सुरुवात करत realme P1 5G आणि realme P1 Pro 5G (माहिती येथे वाचा) लाँच केले आहेत. या दोन्ही मोबाईलनंतर आता कंपनी भारतात अपनी ‘नारजो‘ सीरिजचा पण विस्तार करणार आहे. ब्रँडकडून येत्या 24 एप्रिलला realme NARZO 70x 5G फोन भारतात लाँच केला जाईल.

realme NARZO 70x 5G भारतातील लाँचची माहिती

रियलमी नारजो 70 एक्स 5 जी फोन 24 एप्रिलला भारतात लाँच होईल. हा फोन कंपनी वचुर्अल कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय बाजारात आणेल जो दुपारी 12 वाजता सुरु होईल. NARZO 70x लाँचचा कार्यक्रम ब्रँडच्या अधिकृत वेबसाईट सोबतच रियलमीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहायला मिळेल.

realme NARZO 70x 5G किंमत रेंज

फोनच्या लाँचच्या तारखेची घोषणा करण्यासोबतच कंपनीकडून सांगण्यात आले आहे की realme NARZO 70x 5G 12 हजाराच्या बजेटमध्ये आणला जाईल. नारजो 70 एक्स 5 जी 11,999 रुपयांमध्ये ​सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. परंतु ही फोनची इफेक्टिव किंमत पण असू शकते तसेच मोबाईलची वास्तविक किंमत 13,000 रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते.

realme NARZO 70x 5G चे स्पेसिफिकेशन

मोबाईलची अधिक माहिती अजून समोर आलेली नाही परंतु ब्रँडकडून अधिकृत करण्यात आले आहे की हा फोन 45W Fast Charging ला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 50 Magapixel Main Camera दिला जाईल. फोनमध्ये Side Fingeerprint Sensor मिळेल. NARZO 70x 5G च्या इतर स्पेसिफिकेशनसाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Published by
Kamal Kant