Home बातम्या 24GB रॅमच्या पॉवरसह लॉन्च झाला Realme Note 60 स्मार्टफोन, पण भारतीय ग्राहक करू शकणार नाहीत खरेदी!

24GB रॅमच्या पॉवरसह लॉन्च झाला Realme Note 60 स्मार्टफोन, पण भारतीय ग्राहक करू शकणार नाहीत खरेदी!

Realme note 60 लाँच झाला आहे. कंपनीने या फोनला सर्वप्रथम इंडोनेशियन मार्केटमध्ये लाँच केले आहे जो 32MP कॅमेरा, 24GB रॅम (8+16) आणि 5,000mAh च्या शक्तिशाली बॅटरीने सुसज्ज आहे. हा मोबाईल भारतात जुलै मध्ये लाँच झालेल्या Realme C61 स्मार्टफोन सारखा आहे. त्यामुळे कंपनी हा मोबाईल अजून भारतात आणणार नाही. पुढे तुम्ही Realme Note 60 चे फिचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत वाचू शकता.

Realme Note 60 ची किंमत

सर्वप्रथम किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Realme Note 60 च्या 4GB + 64GB बेस मॉडेलची किंमत Rp1.399.000 आहे जी भारतीय चलनानुसार सुमारे 7,580 रुपये आहे. त्याचप्रमाणे 6GB + 128GB ची किंमत Rp1.599.000 म्हणजेच अंदाजे 8,660 रुपये आणि सर्वात मोठ्या मॉडेलची 8GB + 256GB किंमत Rp1.999.000 म्हणजे अंदाजे 10,830 रुपये आहे. इंडोनेशियामध्ये हा फोन मार्बल ब्लॅक आणि व्हॉयजर ब्लू कलरमध्ये खरेदी करता येईल.

Realme Note 60 चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: Realme Note 60 स्मार्टफोन 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन IPS LCD पॅनेलवर तयार केली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 560 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते.

प्रोसेसर: Realme Note 60 हा अँड्रॉईड 14 वर सादर केला गेला आहे जो रिअलमी युआय सोबत मिळून काम करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 12nm फॅब्रिकेशनवर बनवलेला UNISOC T612 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचवेळी, ग्राफिक्ससाठी हा फोन Mali-G57 GPU ला सपोर्ट करतो.

मेमरी: इंडोनेशिया मध्ये Realme Note 60 स्मार्टफोन 4GB, 6GB आणि 8GB रॅमवर लाँच झाला आहे. या फोनमध्ये 16GB व्हर्चुअल रॅम दिली गेली आहे जे फिजिकल रॅम सोबत मिळून त्याला 24GB रॅमची शक्ती देते. फोनमध्ये 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आणि 2TB पर्यंत कार्ड सपोर्ट मिळत आहे.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी Realme Note 60 च्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅश ने सुसज्ज एफ/1.8 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर प्रदान केला आहे. जो 4-इन-1 पिक्सेल बिनिंग तंत्रज्ञानावर काम करतो. तर त्याच्या फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी Realme Note 60 4G स्मार्टफोन 5,000 mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो. त्याचवेळी या मोठ्या बॅटरीसोबतच मोबाईलमध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट आणि 10W चार्जिंग तंत्रज्ञान देखील मिळत आहे.

इतर फिचर्स: Realme Note 60 हा मोबाईल IP64 प्रमाणित आहे ज्यामुळे ते याला पाणी आणि धूळ यांच्यापासून संरक्षित करते. यात 3.5mm हेडफोन जॅक, साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 5Gहर्ट्झ वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.0 सारखी फिचर्स आहेत.

Realme C61 आणि Realme Note 60 मधील फरक

आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे, इंडोनेशियामध्ये लाँच केलेला Realme Note 60 भारतात विकल्या जाणाऱ्या Realme C61 सारखाच आहे. या दोन फोनमधील मोठा फरक म्हणजे डायनॅमिक रॅम आहे. C61 जिथे 6GB फिजिकल रॅम सह 6GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. तर Note 60 मध्ये 8GB इंटरनल रॅम सोबत 16GB व्हर्चुअल रॅम मिळत आहे.
या व्यतिरिक्त भारतीय Realme C61 मध्ये 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळत आहे तर Realme Note 60 मध्ये 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले गेले आहे. त्याचवेळी आणखी एक मोठा फरक या फोनचे वॉटर आणि डस्ट प्रूफिंग हे देखील आहे. भारतीय C61 हा IP54 रेटिंगसह आला होता परंतु इंडोनेशियन Note 60 ला IP67 सर्टिफिकेशन प्राप्त झाले आहे.

Realme C61 किंमत आणि स्पेसिफिकेशन

Realme C61 तीन व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचा 4GB रॅम असलेला 64GB मेमरी व्हेरिएंट 7,699 रुपयांना आणि 128GB स्टोरेज मॉडेल 8,499 रुपयांना खरेदी करता येईल. तर या मोबाईलच्या सर्वात मोठ्या 6GB रॅम + 128GB स्टोरेजचा दर 8,999 रुपये आहे. हा Realme फोन सफारी ग्रीन आणि मार्बल ब्लॅक रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन वरील Realme Note 60 प्रमाणेच आहेत. आणि Realme C61 चे संपूर्ण तपशील तुम्ही (येथे क्लिक करून) देखील वाचू शकता.