Home बातम्या 5200mAh बॅटरी, 80 वॉट चार्जिंग असलेला realme P2 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

5200mAh बॅटरी, 80 वॉट चार्जिंग असलेला realme P2 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

रियलमीने भारतात आपली पी-सीरीज अपग्रेड केली आहे. यानुसार realme P2 Pro 5G स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. यात युजर्सना 2000 निट्स पीक ब्राईटनेस असलेला कर्व डिस्प्ले, पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP65 रेटिंग, रेनवॉटर स्मार्ट टच फिचर, परफॉर्मन्ससाठी स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेट सारखी अनेक वैशिष्ट्ये मिळतील. चला, पुढे किंमत, स्पेसिफिकेशन आणि उपलब्धतेबाबत सविस्तर जाणून घेऊया.

realme P2 Pro 5G ची किंमत आणि उपलब्धता

realme P2 Pro 5G ची डिझाईन

realme P2 Pro 5G ची डिझाईन पाहता युजर्सना यात कर्व पॅनल पाहायला मिळतो. ज्यात पंच होल कॉटआउट आहे. विशेष म्हणजे ब्रँडने फोनला मजबूत बनविण्यासाठी Armor Shield Glass, IP65 वॉटर रेसिस्टेंट टेक्नॉलॉजी दिली आहे. बॅक पॅनलवर एक मोठा कर्व स्क्वायर शेप मॉड्यूल आहे. ज्यात कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश दिसून येत आहे. एकूण मिळून फोन खूप चांगला दिसत आहे. तसेच, कलर ऑप्शन पाहता मोबाईलला पॅरेट ग्रीन आणि ईगल ग्रे सारख्या दोन ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहे.

realme P2 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

रियलमी पी 2 प्रो 5 जी मध्ये 6.7 इंचाचा सॅमसंग कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर 93.2% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 2000 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेस, 5,000,000:1 कंट्रास्ट रेशियो आणि 1.07 बिलियन कलर्स काला सपोर्ट आहे. यात 100% P3 कलर गॅमट सह 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट आणि स्मूद इंटरैक्शनसाठी 240Hz चा टच सॅम्पलिंग रेट मिळतो. तसेच, सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला 7i देण्यात आला आहे.

चिपसेट

रियलमी पी 2 प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 5G चिपसेट आहे, जो जबरदस्त परफॉरमेंस आणि कमी पावर घेतो. हा 4nm प्रोसेसरवर बनविला गेला आहे. यात ग्राहकांना 2.4GHz पर्यंतचे हाय क्लॉक स्पीड मिळते. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी एड्रेनो 710 GPU देण्यात आला आहे. त्याचबरोबर 9-लेयर कूलिंग सिस्टम पण आहे, ज्यात बडे टेम्पर्ड VC आणि ग्रॅफाईट आहेत जो उष्णतेला प्रभावीपणे दूर करतो. आमच्या द्वारे केलेल्या एंटूटू टेस्टिंग मध्ये याला 670441 स्कोर मिळाला आहे.

स्टोरेज आणि रॅम

स्टोरेज आणि स्पेसच्या बाबतीत रियलमी पी 2 प्रो 5 जी मध्ये ग्राहकांना 12 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम रम आणि 512 जीबी पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेजची सुविधा मिळेल. ज्याच्या मदतीने अनेक एप्लीकेशन, डेटा आणि फोटोससह फाईल सेव्ह केली जाऊ शकते.

कॅमेरा

कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर रियलमी पी 2 प्रो 5 जी मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह प्रदान करण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा लेन्स ऑप्टिकल फोटो स्टॅबिलायजेशन टेक्नॉलॉजीसह मिळतो त्याचबरोबर f /2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा उपयोग करण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी युजर्सना 32 मेगापिक्सलचा फ्रंट लेन्स मिळतो.

बॅटरी आणि चार्जिंग

रियलमी पी 2 प्रो 5 जी मध्ये 5200mAh ची मोठी बॅटरी आहे. याला फास्ट चार्ज करण्यासाठी 80W अल्ट्रा-फास्ट चार्जिंग आहे. ब्रँडचा दावा आहे की realme P2 Pro जवळपास 49 मिनिटामध्ये 0-100 टक्क्या पर्यंत चार्ज होतो. हा जास्त वेळापर्यंत चालणारी बॅटरी चार वर्षापर्यत चांगली राहू शकते. कंपनीने सांगितलं आहे की यात 4 वर्षाच्या उपयोगानंतर पण चांगला अनुभव मिळेल.

इतर

मोबाईलचे इतर फिचर्स पाहता यात पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP65 रेटिंग देण्यात आली आहे. त्याचबरोबर ड्युअल सिम 5G, वाय-फाय, ब्लूटूथ, रेनवॉटर स्मार्ट टच फिचर, जीटी मोड, एअर जेस्चर, ड्युअल स्टूडियो स्पिकर, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, AI हायपर एल्गोरिदम, AI पोर्ट्रेट AI अल्ट्रा क्लॅरिटी, AI ग्रुप फोटो एन्हांस सारखे अनेक फिचर्स मिळतील.

ऑपरेटिंग सिस्टम

ऑपरेटिंग सिस्टम पाहता realme P2 Pro 5G स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित रियलमी युआय 5.0 वर चालतो.

realme P2 Pro 5G चे कंपेटीशन

मोबाईलची किंमत आणि त्याच्या वैशिष्ट्यांमुळे, तो बाजारात सध्याच्या अनेक फोनशी स्पर्धा करेल. यामध्ये प्रामुख्याने Motorola Edge 50 Fusion, Infinix GT 20 Pro, Redmi Note 13 Pro या मॉडेल्सचा समावेश आहे.