Realme ने आधीच सांगितले आहे कि कंपनी स्मार्टफोन बाजारात नाव कमवल्यानंतर आता स्मार्ट गॅजेट्स आणि टेलीविजन बाजारात पण पाऊल टाकणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने घोषणा केली होती कि कंपनी आपल्या स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि कंपनी जगात सर्वात आधी Realme Smart TV भारतात लॉन्च करेल. तर आता Realme TV संबंधित एक मोठा लीक समोर आला आहे ज्यात समजले आहे कि ब्रँडचा हा आगामी स्मार्ट टेलीविजन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट पण करण्यात आला आहे आणि या टीव्हीच्या डिस्प्ले साईजचा पण खुलासा झाला आहे.
Realme Smart TV BIS म्हणजे ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड वर लिस्ट केली गेली आहे आणि या लिस्टिंगची माहिती प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मा यांच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर या लिस्टिंगचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे ज्यावरून समजले आहे कि रियलमी टीव्ही बीआईएस वर JSC55LSQLED मॉडेल नंबर सह लिस्ट केली गेली आहे. या लिस्टिंग मध्ये टीव्हीच्या स्क्रीनची पण माहिती मिळाली आहे. इथे Realme TV 43 इंचाच्या पॅनल सह लिस्ट आहे. आशा आहे कि रियलमी टीव्हीचा बेस मॉडेल 43 इंचाचा असेल आणि कंपनी या साईज पेक्षा मोठे डिस्प्ले असलेले मॉडेल्स पण बाजारात आणेल.
रियलमीने आधीच सांगितले आहे कि कंपनी भारतात आपली स्मार्टटीवी पण लॉन्च करेल. Realme ब्रँडच्या पहिल्या स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि हि स्मार्ट टीवी यावर्षी दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. Realme TV बाबत माधव म्हणाले कि जगात पहिल्यांदा भारतातच लॉन्च होईल आणि भारतीय यूजर्सना केंद्रस्थानी ठेऊन रियलमी टीवी मध्ये खास कस्टमाइजेशन केले जात आहे. Realme Smart TV एप्रिल पासून जून दरम्यान भारतात लॉन्च होईल. आशा आहे कि Realme Smart TV फक्त कमी किंमतीत येणार नाही तर इंडियन यूजर्सच्या दृष्टीने टीवी मध्ये कंटेंट पण मिळेल.
Realme Watch
Realme Watch ची माहिती स्वतः रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी दिली आहे. माधव सेठ यांनी फक्त हे बाब स्पष्ट केली तर कंपनी लवकरच भारतात आपला पहिला स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे त्याचबरोबर माधव यांनी या Smart Watch चा लुक पण शेयर केला आहे. कालच म्हणजे 25 मार्चला झालेल्या आस्क माधवच्या सेशन मध्ये माधव सेठ यांनी इंटरव्यू मध्ये रियलमी की स्मार्ट वॉच हातात घातला होता. स्मार्ट वॉच मनगटावर बांधून माधव सेठ यांनी आगामी रियलमी वॉचचा लुक समोर ठेवला आहे.
रियलमी स्मार्टवॉच चौकोनी आकाराच्या डॉयलचा आहे. वीडियो मध्ये माधव यांनी ब्लॅक कलरचा स्मार्टवॉच परिधान केला होता. माधव यांनी आगामी Realme SmartWatch ची माहिती दिली नाही पण स्पष्ट केले आहे कि कंपनी या स्मार्टवॉचच्या कमला लागली आहे आणि येत्या काही दिवसांत लवकरच हा इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे या सेशन मध्ये माधव सेठ यांनी Realme 6 Pro स्मार्टफोनचा पर्पल कलर वेरिएंट पण लॉन्च होणार असल्याची माहिती दिली आहे.
Realme Band
रियलमीने अलीकडेच भारतात पहिला फिटनेस ट्रॅकर Realme Band लॉन्च केला होता. याची किंमत 1499 रुपये ठ्वली होती. हा डिवाइस 24 तास हेल्थ असिस्टेंटच्या रूपात काम करतो. यात हार्ट रेट मॉनिटर, आइडल अलर्ट आणि वॉटर ड्रिंक रिमाइंडर सारखे फीचर्स मिळतात. कंपनीचा दावा आहे कि जास्त चांगल्या परिणामांसाठी याचा हार्ट रेट मॉनिटर खासकरून भारतीयांच्या दृष्टीने बनवला गेला आहे.
