Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी यावर्षी मोबाईलचा महामेळावा असलेल्या टेक ईवेंट मोबाईल वर्ल्ड मध्ये सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच रियलमी या जागतिक आयोजनात सहभागी होणार आहे. MWC 2020 मध्ये 24 फेब्रुवारीला Realme चा ईवेंट होईल ज्यात कंपनी आपल्या नवीन टेक्नॉलॉजी सोबतच नवीन प्रोडक्ट्स सादर करेल. आतापर्यंत अंदाज लावला जात आहेत कि या ईवेंट मध्ये Realme आपला 5जी फोन लॉन्च करू शकते. आज रियलमीने यावर शिक्कामोर्तब करत अधिकृत घोषणा केली आहे कि एमडब्लूसी मध्ये Realme आपला 5G स्मार्टफोन लॉन्च करेल.
Realme ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेल वर ट्वीट करून या लॉन्चची माहिती दिली आहे. रियलमीने आपल्या यूरोपियन अकाउंट वरून ट्वीट करून सांगितले आहे कि कंपनी यावेळी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस 2020 मध्ये सहभागी होऊन आपला नवीन 5G फोन लॉन्च करेल. या ट्वीट मध्ये कंपनीने #realme5G चा वापर केला आहे. Realme ने आपल्या या आगामी स्मार्टफोनचे नाव सांगितले नाही पण अशी चर्चा आहे कि हा स्मार्टफोन Realme X50 Pro नावाने मार्केट मध्ये येऊ शकतो. Realme X50 Pro बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले सह येऊ शकतो आणि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.
Hey MWC, it's realme! We are ready to be the 5G Populariser.
Are you ready to leap into the 5G era with us? #realme5G. pic.twitter.com/tTORB8CYpq
— realme Europe (@realmeeurope) February 6, 2020
Realme X50 5G
रियलमी एक्स50 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.57 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट वर विजुअल देईल. Realme X50 कंपनीने रियलमी यूआई आधारित एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो क्वॉलकॉमच्या Snapdragon 765G चिपसेट वर चालतो. क्वॉलकॉमचा हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) ला सपोर्ट करतो. या चिपसेटमुळे 5G कनेक्टिविटी असलेला स्मार्टफोन मीड रेंज मध्ये उपलब्ध झाला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Realme X50 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा Samsung GW1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.5 अपर्चर असलेला 2x झूम 12 मेगापिक्सल सेंसर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची चौथी लेंस आहे. Realme X50 ब्रँडचा पहिला ऐसा फोन आहे जो डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे.
Realme X50 कंपनीने कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हि कूलिंग सिस्टम खासकरून गेमिंगच्या चाहत्यांसाठी आहे, जी मोबाईल गेमिंग एक्सपीरियंस स्मूद, फास्ट आणि लॅग फ्री करेल. Realme X50 चीन मध्ये 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Realme X50 मध्ये पावर बॅकअपसाठी 30W VOOC 4.0 चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
