Home बातम्या 4जीबी रॅम आणि वॉटरड्रॉप नॉच असलेला रियलमी यू1 ची किंमत झाली थेट 1,500 रुपयांनी कमी

4जीबी रॅम आणि वॉटरड्रॉप नॉच असलेला रियलमी यू1 ची किंमत झाली थेट 1,500 रुपयांनी कमी

​टेक ब्रँड रियलमी ने याच महिन्यात आपल्या यूजर्सना भेट देत ब्रँडच्या स्मार्टफोन्स वर डिस्काउंट सुरु केला होता. रियलमी ने रियलमी 2 प्रो आणि रियलमी यू1 वर 1,000 रुपयांची सूट देत आहे तर रियलमी सी1 कंपनी द्वारा 500 रुपयांच्या डिस्काउंट सह विकला जात होता. हि ऑफर तीन दिवस होती. आता रियलमी ने आपला स्वस्त स्मार्टफोन रियलमी यू1 अजूनच स्वस्त केला आहे. कंपनी ने रियलमी यू1 च्या किंमतीत 1,500 रुपयांची कायमची कपात केली आहे.

रियलमी ने रियलमी यू1 च्या 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये थेट 1,500 रुपयांची कापत केली आहे. किंमत कमी केल्यानंतर 14,999 रुपयांचा रियलमी यू1 चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच कंपनी ने रियलमी यू1 चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट चे मुल्य पण 1,000 रुपयांनी कमी केली आहे. प्राइज कट नंतर रियलमी यू1 चा हा वेरिएंट 11,999 रुपयांच्याऐवजी आता 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रियलमी यू1 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले वर सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप मधील ड्यूड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा फोन 6.3-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या नॉच मधेच सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी यू1 एम्बिशियस ब्लॅक, ब्रेव ब्लू आणि फेरी गोल्ड कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

आपला नवीन स्मार्टफोन रियलमी ने कलर ओएस 5.2 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर केला गेला आहे. हा फोन 2.1 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक च्या लेटेस्ट चिपसेट हेलीयो पी70 वर चालतो. हेलीयो पी70 चिपसेट वर आजपर्यंत भारतात कोणताही स्मार्टफोन लॉन्च झाला नाही. रियलमी यू1 पहिला फोन आहे जो बाजरात या चिपसेट सह आला आहे. या फोन मध्ये ग्राफिक्स साठी एआरएम जी72 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोनच्या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रियलमी यू1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 25-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनचे दोन्ही कॅमेरा सेटअप बोका इफेक्टला सपोर्ट करतात.

रियलमी यू1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी रियलमी यू1 मध्ये ओटीजी सपोर्ट सह 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.