Home बातम्या Redmi 13 5G ची भारतातील लाँच येथे पाहा लाईव्ह, 13 हजारांच्या रेंजमध्ये मिळेल 108MP Camera

Redmi 13 5G ची भारतातील लाँच येथे पाहा लाईव्ह, 13 हजारांच्या रेंजमध्ये मिळेल 108MP Camera

Redmi 13 5G भारतात लाँच होत आहे. 9 जुलैच्या दुपारी 12 वाजता हा फोन भारतीय बाजारात आणला जाईल. 108MP Camera आणि 5030mAh Battery च्या ताकदीसह या फोनच्या लाँचचा कार्यक्रम खाली दिलेल्या लिंकवर लाईव्ह पाहू शकता तसेच रेडमी 13 5 जी ची किंमत, सेलची माहिती, फिचर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती जाणून घेऊया.

Redmi 13 5G भारतातील लाँचची लाईव्ह लिंक :

Redmi 13 5G किंमत इन इंडिया (लीक)

अलीकडेच रेडमी 13 5जी च्या रॅम व स्टोरेज मॉडेल सोबतच याची किंमत पण इंटरनेटवर लीक झाली होती. सांगण्यात आले आहे की फोनच्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये असेल. तसेच रेडमी 13 5 जी 8 जीबी रॅमची किंमत 15,999 रुपये असेल. लीकनुसार सुरुवाती सेलमध्ये कंपनी 1000 रुपयांची ऑफर पण देईल ज्याच्यानंतर इफेक्टिव किंमत क्रमश: 12,999 रुपये आणि 14,999 रुपये असेल.

Redmi 13 5G चे स्पेसिफिकेशन

परफॉर्मन्स : Redmi 13 5G फोन अँड्रॉईड 14 आधारित HyperOS वर लाँच होईल. तसेच प्रोसेसिंगसाठी यात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Qualcomm Snapdragon 4 Gen 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल जो 2.3GHz क्लॉक स्पीडवर रन करेल.

स्क्रीन : रेडमी 13 5 जी फोनला Crystal Glass Design वर लाँच केले जाईल. यात फ्लॅट पॅनल असणारा 6.6 इंचाचा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 90 हर्ट्झ रिफ्रेशवर काम करेल. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 मिळू शकते.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी रेडमी 13 5 जी ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल आहे, ज्याच्या बॅक पॅनलवर एलइडी फ्लॅशसह एफ/1.75 अपर्चर असलेला 108MP मेन सेन्सर आणि 2MP सेकंडरी लेन्स मिळेल. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉ​लिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5030mAh Battery दिली जाईल. तसेच बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी रेडमी 13 5 जी फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल.