शाओमीचा सब-ब्रँड Redmi या महिन्यात (सप्टेंबर) चीनमध्ये Redmi Note 14 सीरीजला लाँच करणार आहे, डिव्हाईस लाँच करून कंपनीने अधिकृत पुष्टी केली आहे. यातच Xiaomi नं आपल्या घेरलू मार्केटमध्ये Redmi लाईनअपच्या मध्ये एक नवीन मॉडेल Redmi 14R 5G ऑफर केले आहे, कंपनीनुसार या फोनचे उद्देश्य युजर्सला त्यांच्या गरजेनुसार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, ज्यामध्ये विश्वसनीयता आणि व्यावहारिकतेवर ध्यान केंद्रित आहे, चला पुढे तुम्हाला या फोनबाबत संपूर्ण माहिती माहिती देत आहोत.
Redmi 14R ची किंमत आणि सेलची माहिती
Redmi 14R ला कंपनीने चार रॅम व स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. तसेच, ग्राहकांना हा फोन कंपनीच्या साईटवरून Shadow Black, Deep Sea Blue, Lavender आणि Olive Green कलरमध्ये विकत घेता येईल. चला पुढे तुम्हाला फोनच्या किंमतीबाबत सांगतो.
- 4GB+128GB: 1,099 CNY (जवळपास Rs 12,960)
- 6GB+128GB: 1,499 CNY (जवळपास Rs 17,680)
- 8GB+128GB: 1,699 CNY (जवळपास Rs 20,040)
- 8GB+256GB: 1,899 CNY (जवळपास Rs 22,400)
काय भारतात लाँच होईल Redmi 14R?
तुम्हाला सांगतो की कंपनीने Redmi 14R च्या भारतीय लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तसेच भारतीय बाजारात अजून रेडमी 13 सीरीजचे अपग्रेडेड व्हर्जनला आणले नाही. यामुळे आशा आहे की Redmi 14 सीरीजच्या लाँच सह या मॉडेलला पण भारतीय मार्केटमध्ये लाँच केले जाईल.
कशी आहे Redmi 14R ची डिझाईन
डिव्हाईसचे वजन मटेरियलच्या आधारावर 205.39 ग्रॅम ते 212.35 ग्रॅम पर्यंत आहे. फोनची साईज 171.88 x 77.8 x 8.22 मिमी आहे. तसेच, फोनच्या मागे सर्कुल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे जो की थोडा वरती वाटत आहे. तसेच मागे खालच्या बाजूला कंपनीची ब्रँडिंग पाहायला मिळत आहे. तसेच, फ्रंटला पंच-होल डिस्प्ले आणि उजवीकडे वॉल्यूम व पावर बटन प्लेसमेंट करण्यात आले आहे. फोनच्या बॉटमला टाईप-सी चार्जिंग पोर्ट व स्पिकर ग्रिल आहे.
Redmi 14R 5G चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Redmi 14R 5G मध्ये 1640 x 720p रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश असणारी 6.88-इंचाची स्क्रीन आहे. हा हाय ब्राईटनेस मोड मध्ये 600 निट्स पर्यंत जाऊ शकते.
- प्रोसेसर: फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे, जो Redmi 13R मध्ये वापर केलेल्या Dimensity 6100+ पेक्षा चांगला असल्याचे सांगितले जात आहे.
- कॅमेरा: ऑप्टिक्स पाहता Redmi 14R 5G मध्ये 13MP चा रिअर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा हाय-अँड नाही, परंतु आम्हाला वाटत आहे रेगुलर फोटो घेणे आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी खूप चांगला आहे.
- बॅटरी: Redmi 14R 5G मध्ये 5160mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्याच्या मदतीने यूजर डिव्हाईसला एकदा चार्ज केल्यावर पूर्ण दिवस वापर करू शकतो. तसेच, ब्रँडने बॉक्समध्ये 10W चार्जर पण दिला आहे, परंतु फोनला 18W फास्ट चार्जिंगसह आहे.
- ओएस: सॉफ्टवेअर पाहता डिव्हाईस Android 14-आधारित हायपरओएस ऑपरेटिंग सिस्टम सह येतो.
- इतर: अतिरिक्त सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम क्षमता, मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि सिंगल स्पिकरचा समावेश आहे.
