शाओमी ने आज भारतात आपली Redmi 9 सीरीज वाढवत Redmi 9 Prime स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनी गेल्या काही दिवसांपासुन रेडमी 9 प्राइम बाबत माहिती देत होती. आज एका ऑनलाइन इवेंट मध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे. रेडमी 9 प्राइम फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला गेला आहे, ज्याची माहिती कंपनीने लॉन्चच्या आधी दिली होती. Redmi 9 Prime जून मध्ये लॉन्च केल्या गेलेल्या Redmi 9 ग्लोबल वेरिएंटचा रीब्रँडेड वर्जन आहे.
डिजाइन
Redmi 9 prime चार कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे, ज्यात स्पेस ब्लू, मॅट ब्लॅक, मिंट ग्रिन आणि सनराइज फ्लेअर आहे. वॉटर ड्रॉप नॉच सह येणाऱ्या या फोन मध्ये फोन तिन्ही बाजूंना कमी बेजल आहेत, तर बॉटमला थोडा जाड बेजल आहे. उजव्या पॅनल वर पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर आहे. तर बॉटमला टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. फोन मध्ये पी2आई नॅनो कोटिंग पण आहे जी याला स्प्लॅश रेसिस्टेंट बनवते. Auro 360 डिग्री डिजाइन वर सादर करण्यात आलेल्या या फोनच्या फ्रंटला कोर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे तसेच मागे नॉन-स्लिप रिपल टेक्चर आहे. मागे क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल या कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे.
शानदार कॅमेरा
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi 9 Prime मध्ये बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी शाओमी रेडमी 9 प्राइम एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
दमदार बॅटरी
Xiaomi Redmi 9 Prime डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोन सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा डिवाईस Quick Charge 3.0 व 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,020एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
स्पेसिफिकेशन्स
शाओमी रेडमी 9 प्राइस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:5 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एफएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केली गेली आहे. Xiaomi Redmi 9 प्राइम चे डायमेंशन 163.32 × 77.01 × 9.1एमएम आहे.
प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टा-कोर (2x ARM Cortex A-75 + 6x ARM Cortex A-55) प्रोसेसर सह 12नॅनोमीटर टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी52 जीपीयू ला सपोर्ट करतो. रेडमी 9 प्राइम स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि eMMC 5.1 स्टोरेजला सपोर्ट करतो.
किंमत
Redmi 9 Prime एक रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. फोन विक्रीसाठी अमेझॉन इंडिया वर 6 ऑगस्ट पासून विक्रीसाठी सादर केला जाईल. Amazon Prime Day Sale 2020 6 ऑगस्ट पासून सुरु होऊन 12 ऑगस्ट पर्यंत सुरु असेल. तसेच काही दिवसांनंतर ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर पण हा फोन विक्रीसाठी सादर केला जाईल.
