शाओमीचा सब ब्रँड रेडमी आपल्या K70 सीरीजचा विस्तार करत आहे. यात नवीन मॉडेल Redmi K70 Ultra लाँच होणार आहे. ब्रँडने यासाठी टिझर पण शेअर केला आहे. परंतु अजून सादर होण्याची तारीख समोर आली नाही, मात्र डिव्हाईस या महिन्यात येऊ शकतो. तसेच, मार्केटमध्ये एंट्री घेण्याच्या आधी रेडमी के70 अल्ट्रा बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशनसह स्पॉट झाला आहेत. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
Redmi K70 Ultra गीकबेंच लिस्टिंग
- गीकबेंच लिस्टिंगमध्ये नवीन स्मार्टफोन 2407FRK8EC मॉडेल नंबरसह समोर आला आहे. हा मॉडेल नंबर पहिला IMEI डेटाबेसवर दिसला होता ज्यामुळे Redmi K70 Ultra च्या नावाची पुष्टी होत आहे.
- आगामी Redmi K70 Ultra स्मार्टफोनने गीकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 2218 अंक आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 7457 अंक प्राप्त केले आहेत.
- डिव्हाईसमध्ये Rothko मदरबोर्ड सह ऑक्टा-कोर SoC मिळण्याची चर्चा आहे. हा 3.4GHz च्या पीक क्लॉक स्पीड आणि Mali-G720-Immortalis MC12 GPU सह येऊ शकतो.
- वरती दिलेल्या माहितीवरून असे वाटत आहे की फोनमध्ये 4nm प्रक्रियावर बनलेला MediaTek Dimensity 9300+ चिपसेट दिला जाऊ शकतो.
- पावरफुल प्रोसेसरसह फोनमध्ये जवळपास 16GB पर्यंत रॅम दिली जाऊ शकते. तसेच यात अँड्रॉईड 14 ओएस असणार आहे.
Redmi K70 Ultra चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)
- ब्रँडने टिझरच्या माध्यमातून कंफर्म केले आहे की नवीन रेडमी के70 अल्ट्रा पाणी आणि धूळीपासून वाचणाऱ्या IP68 रेटिंगसह लाँच केला जाईल.
- 3 सी सर्टिफिकेशन लिस्टिंगनुसार डिव्हाईसमध्ये 120 वॉट फास्ट चार्जिंग मिळणार असल्याची चर्चा आहे. तर पावर बॅकअपसाठी 5000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.
- गीकबेंच लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनला 16GB पर्यंत रॅमसह दाखविण्यात आले आहे. तर संभावित स्तरावर डिव्हाईस 24 जीबी पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो.
- फोनची डिस्प्ले साईजची माहिती अजून मिळाली नाह, मात्र आशा आहे की यात 144Hz रिफ्रेश रेट असणारी स्क्रीन मिळू शकते.
