भारतात सध्या बजेट सेगमेंटमध्ये शाओमी आणि रेडमीमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दोन्ही कंपन्या एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन सादर करत आहेत. आता शाओमी आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत लवकरच Note 11 सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ही रेडमीची खूप लोकप्रिय सीरिज आहे. शाओमीनं आगामी Redmi Note 11 SE स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. हा फोन भारतात 26 ऑगस्ट 2022 ला लाँच केला जाईल.
Redmi India नं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करून ही माहिती दिली आहे की Redmi Note 11 SE दोन दिवसांनी भारतात लाँच होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात लाँच होणारा हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या Redmi Note 10 चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो. परंतु या फोनचा इंडिया व्हेरिएंट चीनपेक्षा खूप वेगळा असू शकतो. तर काही रिपोर्टमध्ये असा देखील दावा केला जात आहे की रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन अपकमिंग Poco M5s सारखा असेल. रेडमीकडून मात्र या स्मार्टफोनबद्दल जास्त माहिती मिळाली नाही.
All SEt for the new performer on the block. ?
The stunning #RedmiNote11SE arrives on 26th August.
?https://t.co/cwYEXedZWw | @Flipkart
Know more: https://t.co/3HcDF7jv6v pic.twitter.com/bi2ccpRKHG— Redmi India (@RedmiIndia) August 24, 2022
Redmi Note 11 SE चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार Redmi Note 11 SE स्मार्टफोन भारतात 6.43-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह सादर काळे जाऊ शकतो. ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ असेल. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात येईल.
रेडमीचा हा स्मार्टफोन MediaTek च्या Helio G95 प्रोसेसर आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर केला जाईल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित MIUI 13 सह बाजारात येऊ शकतो. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. हा फोन ड्युअल स्टिरियो स्पिकर्ससह बाजारात येईल. तसेच यात चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट देण्यात येईल.
कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi Note 11 SE स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा मिळेल. प्रायमरी कॅमेऱ्यासह 8MP चा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2MP चे दोन सेन्सर मिळतील, ज्यात डेप्थ आणि मॅक्रो कॅमेऱ्याचा समावेश असेल. रेडमीच्या या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी मोठी बॅटरी मिळेल. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केली जाईल.
Redmi Note 11 SE ची किंमत
Redmi Note 11 SE च्या किंमतीची अधिकृत माहिती मात्र अजूनतरी समोर आली नाही. परंतु हा फोन मिडरेंजमध्ये सादर होण्याची शक्यता जास्त आहे. भारतात लाँच झाल्यानंतर हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.
