Xiaomi नं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आपली दणकट Redmi Note 12 सीरिज सादर केली होती. या सुपरहिट मिड रेंज स्मार्टफोन सीरीजमध्ये कंपनीनं चार स्मार्टफोन सादर केले आहेत. यात Redmi Note 12, Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition चा समावेश करण्यात आला होता. आता शाओमी रेडमी नोट सीरिजची ही नवी पिढी लवकरच भारतात लाँच होऊ शकते. शाओमीनं Redmi Note 12 Series चा इंडिया लाँच टीज करण्यास सुरुवात केली आहे.
Redmi Note 12 Series India Launch
रेडमीनं आपल्या सोशल मीडिया हँडलवरून आगामी Redmi Note 12 5G सीरीज लाँचची माहिती देत नव्या सीरिजला ‘सुपर नोट’ (SuperNote) म्हटलं आहे. परंतु कंपनीनं ही सीरिज नेमकी कधी लाँच होईल हे सांगितलं नाही. तसेच या सीरिजमध्ये किती आणि कोणते मॉडेल येतील हे देखील स्पष्ट करण्यात आलं नाही. आशा आहे की ही सीरिज नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार सीरिजमधील 200MP कॅमेरा असलेला Redmi Note 12 Pro+ भारतात येऊ शकतो, जोडीला Redmi Note 12 असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी आला शानदार प्लॅन; कमी किंमतीत मिळणार 30 दिवसांची वैधता
The legacy is about to get 12 ????? ??????, ??????, ??? ????? amazing with the most noteworthy phone of the year. ♥️
The #RedmiNote12 5G series is not just a note it's the #SuperNote. ?
Get Notified: https://t.co/bSN7VljgxA pic.twitter.com/xDCmTKZwgU
— Redmi India (@RedmiIndia) December 7, 2022
जागतिक बाजारातील Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro+ स्मार्टफोन्समध्ये 6.67-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशीओ, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 900nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 1080 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे, जोडीला Mali-G68 GPU आहे. दोन्ही फोन्स Android 12 आधारित MIUI 13 वर चालतात.
यातील Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करतो, जो 6P लेन्स, OIS ला सपोर्ट करतो. सोबत 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi Note 12 Pro+ मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. परंतु यातील मुख्य कॅमेरा एफ/1.65 अपर्चर असलेला 200MP Samsung HPX सेन्सर आहे, जो 7P लेन्स, ALD कोटिंग आणि OIS ला सपोर्ट करतो. जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये देखील 16MP चा सेल्फी सेन्सर मिळतो. हे देखील वाचा: 6000mAh च्या बॅटरीसह स्वस्त Tecno Pova 4 ची भारतात एंट्री; 13GB रॅमसह 50MP चा शानदार कॅमेरा
कनेक्टिव्हिटीसाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.0, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट चार्जिंग व डेटा ट्रान्सफरसाठी देण्यात आला आहे. Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमधील 5000mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर Note 12 Pro+ मधील बॅटरी 120W फास्ट चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो, तसेच फोन्स स्टिरियो स्पिकर्स आणि एक्स अॅक्सिस लिनियर मोटारला सपोर्ट करतात.
