रेडमीनं आपल्या ‘नोट 12’ सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन 5जी फोन Redmi Note 12T Pro टेक मंचावर सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये एंट्री करू शकतो. नवीन नोट 12टी प्रो 5जी फोनची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Redmi Note 12T Pro ची किंमत
रेडमी नोट 12टी प्रो 5जी फोन चीनमध्ये तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. सर्वात मोठा मॉडेल 12GB रॅम + 256GB स्टोरेजसह आला आहे तर इतर व्हेरिएंट्समध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहेत. कंपनीनं अद्याप किंमत सांगितली नाही परंतु हा रेडमी फोन blue ice, fog white आणि carbon black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
Redmi Note 12T Pro स्पेसिफिकेशन्स
- 6.6″ FHD+ 144Hz Display
- MediaTek Dimensity 8200
- 64MP Rear Camera
- 16MP Selfie Camera
- 67W 5,080mAh Battery
- स्क्रीन : रेडमी नोट 12टी प्रो 20.5:9 अॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 2460 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एफएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. ह्यात 650निट्स ब्राइटनेस आणि 1400:1 कॉन्ट्रास्ट रेशियो देखील मिळतो.
- प्रोसेसर : Redmi Note 12T Pro मध्ये प्रोसेसिंगसाठी 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 अल्ट्रा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.1गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो मीयुआय 14 सह चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली-जी610 जीपीयू आहे.
- कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स सह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो
- बॅटरी : पावर बॅकअपसाठी नोट 12टी प्रो 5जी फोनमध्ये 5,080एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.
