Redmi 13C 4G आणि Redmi 13C 5G फोन आज भारतात लाँच झाले आहेत. रेडमी 13सी सीरीज भारतीय बाजारात येण्यासोबतच कंपनीने आपल्या ताकदवान स्मार्टफोन Redmi Note 13 Pro+ 5G च्या भारतातील लाँचची घोषणा पण केली आहे. हा मोबाइल फोन पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2024 मध्ये भारतात लाँच होईल ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Redmi Note 13 Pro+ 5G भारतातील लाँच डिटेल
Redmi Note 13 Pro+ 5G जानेवारी 2024 मध्ये भारतात लाँच होईल. कंपनीने Redmi 13C series च्या लाँच दरम्यान याबाबतची घोषणा केली आहे. जाणून घेऊया की 13सी सीरीजचा लाँच व्हिडिओ कंपनीने रेडमी नोट 13 प्रो प्लस 5 जी फोनने रेकॉर्ड केला होता. ब्रँडकडून लाँचबाबत अजून कोणतेही अपडेट मिळाले नाहीत, परतुं कंफर्म केले आहे की Note 13 Pro+ 5G पुढील महिन्यात भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे.
Redmi Note 13 Pro+ 5G स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले : Redmi Note 13 Pro+ मध्ये 6.67-इंच की फुलएचडी+ स्क्रिन देण्यात आली आहे. हा अॅमोलेड पॅनलवर बनी 1.5के डिस्प्ले आहे ज्यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्स पीक ब्राइटनेस मिळते. सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसचे प्रोटेक्शन आहे.
- प्रोसेसिंग : चायना मार्केटमध्ये हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर सादर झाला आहे जो मीयुआय 14 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
- स्टोरेज : Redmi Note 13 Pro+ मध्ये 16 जीबी पर्यंतची रॅम देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन 512जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. अपेक्षा आहे की फोन या मेमरी व्हेरिएंट सह भारतात लाँच होईल.
- कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये OIS सह 200MP सॅमसंग ISOCELL HP3 प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आले आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो.
- बॅटरी: Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या मोठ्या बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी यात 120 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.
- आणखी : हा फोन 3.5 मिमी हेडफोन जॅक, आयआर ब्लास्टर, ड्युअल सिम 5जी, वायफाय 6, ब्लूटूथ 5.3, एनएफसीसह आहे. त्याचबरोबर पाणी आणि धुळीपासून वाचविण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळतो.
