रेडमीचा नवीन मोबाईल फोन Redmi Note 13, Note 13 Pro आणि Note 13 Pro+ भारतात खूप प्रसिद्धी घेत आहे. मागच्या काही दिवसांपासून माहिती समोर आली होती की कंपनी या सीरिजमध्ये आता Redmi Note 13 Turbo स्मार्टफोन घेऊन येणार आहे. तसेच आता Redmi GM ने फोनचा लूक सांगितला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याद्वारे शेअर केलेल्या रेडमी नोट 13 टर्बोचा फोटो तुम्ही पुढे पाहू शकता.
रेडमी नोट 13 टर्बो स्मार्टफोनचा फोटो Redmi General Manager, Wang Teng Thomas ने शेअर केला आहे. हा रेडमी प्रवक्ता पण आहे. थॉमसनने एका व्हिडिओच्या माध्यमातून फोनचा फ्रंट लूक पण दाखवला आहे. या मोबाईलमध्ये पंच-होल स्टाईल असणारी स्क्रिन देण्यात आली आहे जी फ्लॅट पॅनलवर बनली आहे. स्क्रीन पूर्णपणे बेजल लेस आहे ज्याच्या खालच्या बाजूला नॅरो चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या फ्रेमवर वॉल्यूम रॉकर व पावर बटन पण दिसून येत आहे.
प्रोसेसर : रेडमी आपल्या नवीन स्मार्टफोनला नोट 13 टर्बो स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच करू शकते. या क्वॉलकॉमद्वारे आणला गेलेला लेटेस्ट मोबाईल चिपसेट आहे जो 3.0 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
ओएस : रेडमी नोट 13 टर्बो स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच केला जाऊ शकतो ज्यासोबत या मोबाईल फोनमध्ये हायपर ओएस मिळेल.
बॅटरी : लीक्सनुसार पावर बॅकअपसाठी Redmi Note 13 Turbo मध्ये मोठी 6,000 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 80 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पाहायला मिळू शकते. अपेक्षा आहे की हा फोन वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करेल.
डिस्प्ले : Redmi Note 13 Turbo मध्ये 6.78 इंचाची मोठी स्क्रीन दिली जाऊ शकते. लीकमध्ये समोर आले आहे की हा 1.5 के रेजोल्यूशन वाली पंच-होल डिस्प्ले असणार आहे, जी ओएलईडी पॅनलवर बनली आहे. तसेच या स्क्रीनवर 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट पाहायला मिळू शकतो.