Home बातम्या Xiaomi चा धमाका, फक्त 1 महिन्यात विकले 10 लाख Redmi Note 8 आणि Note 8 Pro स्मार्टफोन

Xiaomi चा धमाका, फक्त 1 महिन्यात विकले 10 लाख Redmi Note 8 आणि Note 8 Pro स्मार्टफोन

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने माहिती दिली आहे कि कंपनीने फक्त एका महिन्यात Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro चे 1 मिलियन यूनिट विकले आहेत. क्वाड कॅमेरा सेटअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येणाऱ्या या स्मार्टफोनच्या लोकप्रियतेचा अंदाज विकल्या गेलेल्या हँडसेटच्या यूनिट नंबर्स वरून लावता येईल.

विशेष म्हणजे Xiaomi चे हे आकडे फक्त एका महिन्याचे आहेत. शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने सांगितले होते कि त्यांनी फेस्टिव सीजन मध्ये फक्त एका महिन्यात भारतात 12 मिलियन म्हणजे 1.2 कोटी Xiaomi डिवाइस विकून नवीन रेकॉर्ड बनवला होता.

Redmi Note 8 चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi ने Redmi Note 8 Pro सोबत Redmi Note 8 भारतात लॉन्च केला आहे. या फोन मध्ये 6.3 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

Redmi Note 8 पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सलची अल्ट्रा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Redmi Note 8 मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Redmi Note 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

यात 6.53-इंचाचा फुल-एचडी+ (1080 × 2340 पिक्सल) डिस्प्ले आहे. सोबत फोनच्या फ्रंट आणि बॅक पॅनल वर गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आहे. यात मीडियाटेकच्या नवीन गेमिंग प्रोसेसर हीलियो जी90टी दिला आहे. फोटोग्राफी साठी रेडमी नोट 8 प्रो मध्ये चार रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. हा कंपनीचा पहिला 64-मेगापिक्सल कॅमेरा फोन आहे. या सेंसर सह कंपनीने 8-मेगापिक्सलचा वाइड-अँगल सेंसर आणि दोन 2-मेगापिक्सलचा सेंसर दिला आहे. फोन मध्ये फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Redmi Note 8 Pro ची बॅटरी 4,500 एमएएच ची आहे. हा 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. रेडमी नोट 8 प्रो पण एंड्रॉयड 9 पाई वर आधारित मीयूआई 10 वर चालतो.

शाओमी रेडमी नोट 8 प्रो वीडियो