Categories: बातम्या

2K डिस्प्ले आणि 8000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Redmi Pad ची भारतात एंट्री

टेक निर्माता Xiaomi आपल्या सब ब्रँड रेडमी अंतर्गत नेहमीच शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले किफायतशीर प्रोडक्ट सादर करते. कंपनीनं ही बाब पुन्हा एकदा मिड बजेट सेगमेंटमध्ये Redmi Pad टॅबलेट भारतात लाँच करून अधोरेखित केली आहे. हा टॅबलेट भारतासह जगभरात सादर करण्यात आला आहे. Redmi Pad एंटरटेनमेंट, गेमिंग, ब्राउजिंग आणि ई-लर्निंग उपयुक्त ठरेल. यात जे स्पेक्स देण्यात आले आहेत ते टॅबलेट युजर्सना खूप आवडू शकतात. नवीन Redmi Tab मध्ये मीडियाटेक चिपसेट, 8,000mAh बॅटरी, 2K डिस्प्ले आणि शानदार कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला Redmi Pad चे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

Redmi Pad specifications

Redmi Pad मध्ये 10.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2K आहे. ज्यात 90Hz रिफ्रेश रेट आणि 400 निट्स पीक ब्राइटनेस मिळते. टॅबमध्ये MediaTek Helio G99 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. जोडीला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. हे देखील वाचा: मनमोहक लूकसह Oppo च्या शानदार स्मार्टफोनची एंट्री; स्वस्तात 50MP Camera आणि 5000mAh Battery

फोटोग्राफीसाठी रेडमी पॅडच्या मागे सिंगल कॅमेरा सेन्सर मिळतो 8MP चा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. पावर बॅकअपसाठी या टॅबलेटमध्ये 8,000mAh ची दणकट बॅटरी मिळते जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रेडमीचा नवीन अँड्रॉइड टॅबलेट Android 12 आधारित MIUI 13 वर चालतो.

अन्य फीचर्स पाहता यात डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह क्वॉड स्पिकर देण्यात आले आहेत. स्टोरेज वाढवण्यासाठी डिवाइसमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे. तसेच टॅबमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड WiFi 5, Bluetooth 5.3 सारख्या सुविधा मिळतात. हा रेडमी पॅड टॅबलेट फक्त 7.05 मिमी पातळ आणि याचे वजन 465 ग्राम आहे. हे देखील वाचा: चार्जिंग दरम्यान Electric Scooter चा स्फोट, 7 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू!

Redmi Pad price

शाओमीनं Redmi Pad भारतात तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. यातील 3GB रॅम व 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम व 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 6GB रॅम व 128GB स्टोरेज असलेल्या टॉप एन्ड मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे तिन्ही व्हेरिएंट अनुक्रमे 12,999 रुपये, 14,999 रुपये आणि 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. तसेच Redmi Pad वर 10 टक्के बँक डिस्काउंट देखील मिळेल. Redmi Pad ची विक्री Mi.com, Mi Homes, Flipkart आणि सर्व रिटेल पार्टनर्सच्या माध्यमातून 5 ऑक्टोबरपासून सुरु होईल. कंपनीचा हा सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट मूनलाइट सिल्व्हर, ग्रॅफाइट ग्रे आणि मिंट ग्रीन अशा तीन रंगात विकत घेता येईल.

Published by
Siddhesh Jadhav