Electric Scooter explodes: इलेक्ट्रिक व्हेईकल्स भारतीय बाजारात जेवढी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेवढ्याच जास्त दुर्घटना देखील समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अशा घटना समोर आल्यात आहेत ज्यात इलेक्टिक वाहनांमध्ये आग लागली आहे. अशीच एक घटना आता राज्यातील वसई परिसरात घडली आहे जिथे इलेक्टिक स्कूटर चार्ज करत असताना त्याच्या बॅटरीमध्ये आग लागली तसेच ब्लास्ट झाला. या Electric Scooter blast मुळे 7 वर्षांच्या निरागस मुलाचा मृत्यू झाला आहे.
Electric Scooter Blast
इलेक्टिक स्कूटरमुळे ही मोठी दुर्घटना महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंसारी नावाच्या एका व्यक्तीनं नवीन इलेक्टिक स्कूटर खरेदी केली होती. एका रात्री त्यांनी आपली स्कूटरची बॅटरी चार्जवर ठेवली होती आणि चार्जिंग दरम्यान अचानक त्या बॅटरीमध्ये मोठा धमाका झाला. अंसारी यांचा 7 वर्षांचा मुलगा शब्बीर शाहनवाज या Battery blast च्या तावडीत सापडला आणि भयानक पद्धतीनं भाजला गेला. हे देखील वाचा: T20 World Cup: प्रत्येक क्रिकेट मॅचची मजा मिळवा तुमच्या फोनवर, या 5 अॅप्सवर बघा लाइव्ह
वसई पूर्वेकडील रामदास नगरचे रहिवाशी शाहनवाज अंसारी यांनी 23 सप्टेंबरला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती. मात्र पहाटे बॅटरीचा भीषण स्फोट झाला. त्यात हॉलमध्ये झोपलेले शाहनवाज यांचा सात वर्षाचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुकसाना हे दोघे जखमी झाले.
ब्लास्टमुळे निरागस मुलाचा मृत्यू
बॅटरी ब्लास्टच्या तावडीत सापडलेल्या 7 वर्षाच्या मुलाचे शरीर 70 टक्क्यांपर्यंत भाजलं होतं आणि घाई घाईने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. खूप जास्त भाजल्यामुळे मुलाला रिकव्हर होता आलं नाही आणि काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केलं. रिपोर्टमधून अजूनतरी आतापर्यंत Electric Scooter ब्रँड आणि मॉडेलची माहिती मात्र समोर आली नाही.
Electric Scooter Showroom मध्ये आग
गेल्या महिन्यात एक इलेक्ट्रिक स्कूटर शोरूममध्ये आग लागल्याची घटना समोर आली होती. ही दुर्घटना इतकी मोठी होती की यात 8 लोकांचा मृत्यू झाला तसेच जवळपास अर्धा डझन लोक जखमी झाले होते. ही घटना तेलंगानामधील सिकंदराबादमध्ये घडली होती. जिथे एक E-Scooter शोरूमवर इलेक्ट्रिक बाइक चार्ज केली जात होती. अचनाक आग लागली आणि संपूर्ण शोरूममध्ये ही आग वेगानं पसरली आणि आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. आग इतकी भयानक होती की अनेक लोकांनी इमारतीच्या वरच्या माळ्यांवरून उडी घेऊन आपला जीव वाचवावा लागला.हे देखील वाचा: अजून एक 5जी विवो फोन लाँच; 48MP कॅमेऱ्यासह शानदार Vivo Y52 5G ची एंट्री