Home बातम्या शाओमी लवकरच घेऊन येईल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन, वीवो आणि ओपोची होईल सुट्टी

शाओमी लवकरच घेऊन येईल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन, वीवो आणि ओपोची होईल सुट्टी

शाओमी बद्दल अलीकडेच बातमी आली होती की कंपनी कंपनी स्नॅपड्रॅगन 730 सह नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करू शकते. आता चीनच्या सोशल साइट वीबो वर एक नवीन टीजर समोर आला आहे, ज्या मधून माहिती मिळाली आहे की कंपनी आपल्या पॉप अप सेल्फी कॅमेरा वाला फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

वीबो वर पॉप-अप सेल्फी कॅमेर्‍यासह स्मार्टफोनचा फोटो कंपनी ने एका पोस्टच्या कमेंट मध्ये शेयर केली आहे. या स्मार्टफोन मध्ये फुल स्क्रीन डिस्प्ले दिला जाऊ शकतो. दुसरीकडे मार्केट मध्ये आधीच वीवो आणि ओपो सारख्या कंपन्यांनी आधीच पॉप अप सेल्फी कॅमेरा फोन लॉन्च केला आहे.

अलीकडेच मनु कुमार जैन यांनी क्वालकॉम इंडिया चे वीपी आणि प्रेजिडेंट फॉर क्वालकॉम इंडिया ऐंड SAARC राजेश वगाडीया व क्वालकॉम वीपी फॉर प्रॉडक्ट मॅनेजमेंट केदार कोंडप सोबत ट्विटर वर एक फोटो शेयर केला होता. या फोटो मध्ये एक हिंट मिळाली आहे, ज्यावरून असे वाटत आहे की शाओमीच्या अपकमिंग फोन मध्ये क्वालकॉमचा लेटेल्ट स्नॅपड्रॅगन 700 सीरीज प्रोसेसर असेल.

फोटोच्या कॅप्शन मध्ये प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. टीजर मध्ये क्वालकॉमच्या दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या 700 सीरीजच्या प्रोसेसरचा उल्लेख आहे, ज्यावरून अंदाज लावला जात आहे की हा स्नॅपड्रॅगन 730 किंवा स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर असू शकतो. तुमच्या लक्षात असेल कि क्वालकॉम ने आपला लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 730 आणि स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर 9 एप्रिल, 2019 ला सादर केला होता.

विशेष म्हणजे 730 चिपसेट 8nm फॅब्रिकेशन प्रोसेसर वर आधारित आहे आणि स्नॅपड्रॅगन 710 SoC पेक्षा चांगला चालतो. हा चिपसेट Kryo 470 ऑक्टा-कोर सीपीयू आणि गेमिंग साठी एड्रिनो 618 जीपीयू सह येईल.

विशेष म्हणजे हा प्रोसेसर सिंगल 48-मेगापिक्सल सेंसर सह ट्रिपल कॅमेरा सेटअपला सपॉर्ट करू शकतो. मल्टी-फ्रेम नॉइस रिडक्शनच्या मदतीने हा स्नॅपशॉट मोड मध्ये 192-मेगापिक्सल रेजोल्यूशन पर्यंतचे फोटोज देऊ शकतो.

सोर्स