Home बातम्या रेडमीच्या 48-मेगापिक्सल कॅमेरा स्मार्टफोनचे फोटो झाले ऑफिशियल, असेल शानदार फोन

रेडमीच्या 48-मेगापिक्सल कॅमेरा स्मार्टफोनचे फोटो झाले ऑफिशियल, असेल शानदार फोन

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने गेल्याच आठवड्यात माहिती दिली होती कि ते रेडमी आपला सब ब्रँड म्हणून सादर करेल. याच ब्रँड मध्ये पहिला स्मार्टफोन 48-मेगापिक्सल कॅमेरा सह 10 जानेवारीला सादर केला जाणार आहे. 91मोबाईल्सने सर्वात आधी रेडमी ब्रँडच्या पहिल्या स्मार्टफोनचे फोटो दाखवले होते आणि आता रेडमीच्या अपकमिंग स्मार्टफोनचे नवींनवीन फोटो शाओमीचे सीईओ ली जून ने वीबो वर शेयर केले आहेत. तसेच वीबो वर शाओमी ने रेडमीचे वेगळे अकाउंट बनवले आहे, ज्यावरून एक वीडियो शेयर केला गेला आहे. या वीडियो मध्ये रेडमीच्या नवीन स्मार्टफोनची संपूर्ण झलक दाखवण्यात आली आहे. सोबत स्मार्टफोनची मजबूती दाखवण्यात आली आहे.

अफवा आहे कि रेडमीचे नवीन स्मार्टफोन रेडमी एक्स नावाने सादर केले जाऊ शकतात. नुकताच सर्टिफिकेशन साइट टेना वर हा स्मार्टफोन स्पॉट केला गेला होता. साइट वर स्मार्टफोनचे फोटो आणि काही फीचर लिस्ट केले गेले होते. शाओमीचे सीईओ ली जून यांनी फोटो शेयर करून दावा केला आहे कि हे डिवाइसचे खरे फोटो आहेत.

डिवाइसच्या मागे वर्टिकल डुअल कॅमेरा प्लेस्ड आहे. तसेच मागे खालच्या नाजूक रेडमीची ब्रँडिंग दिसत आहे. फोन मध्ये यूएसबी-सी पोर्ट आणि फिंगरप्रिंट सेंसर फ्रंटला असेल. याआधी मिळालेल्या माहितीनुसार रेडमीच्या पहिल्या स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट असेल. तसेच यात 6.3-इंच डिस्प्ले आणि 3,900एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

रेडमी चा नवीन स्मार्टफोन 20,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीती लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे रेडमी सीरीज मध्ये शाओमी ने हि प्राइस रेंज कधी गाठली नाही. शाओमीचे सर्व रेडमी फोन मीड बजेट मध्ये लॉन्च झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार हा फोन कंपनी पंच होल डिस्प्ले सह सादर करू शकते. पण वीबो वरील वीडियो मध्ये फोन मध्ये नॉच दिसत आहे. या नॉच मध्ये तुम्हाला फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.