टेलीकॉम कंपनी रिलायंस जियोने आपल्या ग्राहकांना भेट देत आपल्या स्वस्त प्रीपेड प्लान्स मध्ये बदल केले आहेत. या बदलानंतर यूजर्सना डबल डेटाचा लाभ मिळेल. Jio ने आपले 4G डेटा वाउचर्स अपग्रेड केले आहेत. अपग्रेड केल्यानंतर रिलायंस जियो जुन्या किंमतीत दुप्पट डेटा सह जियो वरून नॉन जियो कॉलिंग मिनिट्स देत आहे.
कंपनीने 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयांचे डेटा वाउचर अपग्रेड केले आहेत. पण या लिस्ट मधील 251 रुपयांच्या वाउचर मध्ये कोणताही बदल केला नाही. या वाउचर मध्ये आधीचेच बेनिफिट मिळतील.
रिलायंस जियोच्या 11 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी 400MB डेटा मिळत होता. पण बदलानंतर या प्लान मध्ये 800MB डेटा सह 75 मिनिट्स जियो ते नॉन जियो कॉलिंग मिनिट्स मिळत आहे. तर 21 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 1 GB डेटा देत होती. पण आता 2 GB डेटा दिला जात आहे. तसेच प्लान मध्ये नॉन जियो नेटवर्क वर 200 कॉलिंग मिनिट्स मिळत आहेत.
51 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 3GB डेटा देत होती. पण आता या वाउचर मध्ये 6 GB डेटा मिळत आहे. तसेच वाउचर मध्ये जियो टू नॉन जियो नेटवर्क वर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स मिळत आहेत. 101 रुपयांच्या डेटा प्लान मध्ये कंपनी आधी 6 GB डेटा ऑफर करत होती, आता कंपनी यात 12 GB डेटा ऑफर करत आहे. त्याचबरोबर नॉन जियो नंबर्स वर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स मिळत आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे या लिस्ट मध्ये 251 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या वाउचर मध्ये 102GB डेटा मिळतो म्हणजे रोज 2GB.
