Home बातम्या Jio ची मोठी कामगिरी, बनली 40 कोटी ग्राहक असलेली देशातील पहिली टेलीकॉम कंपनी

Jio ची मोठी कामगिरी, बनली 40 कोटी ग्राहक असलेली देशातील पहिली टेलीकॉम कंपनी

Reliance Jio ने भारताच्या टेलीकॉम बाजारात पाऊल टाकताना सांगितले होते, हि कंपनी आधीचे सर्व नियम तोडणार आहे आणि इंडियन टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये मोठ्या बदलांना कारणीभूत ठरणार आहे. 4G सर्विस, मोफत सिम आणि मोफत टेलीकॉम सेवा देणाऱ्या जियोला तेव्हा देशातील जनतेने उचलून धरले होते. Jio यूजर्सची संख्या वेगाने वाढली आणि हि देशातील नंबर वन दूरसंचार कंपनी बनली आहे. सतत यश मिळवत असलेल्या रिलायंस जियोने आता अजून एक मोठा खिताब आपल्या नावे केला आहे. Reliance Jio भारतात 40 कोटी यूजर्स असलेली पहिली टेलीकॉम कंपनी बनली आहे.

इंडियन टेलीकॉम इंडस्ट्री संबंधित हि मोठी माहिती देशातील टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी म्हणजे TRAI ने दिली आहे. ट्राईने आपल्या लेटेस्ट रिपोर्ट मध्ये दुसऱ्या सहामाहीच्या पहिल्या महिन्याचे आकडे शेयर केले आहेत, ज्यात सर्व दूरसंचार कंपन्यांच्या यूजर्सची संख्या सांगण्यात आली आहे. या रिपोर्टच्या माध्यमातून समोर आले आहे कि जुलै मध्ये Reliance Jio च्या यूजर्सची संख्या 40 कोटींच्या वर गेली आहे. या संख्येपर्यंत आतापर्यंत भारतात कोणतीही कंपनी पोहचली नाही. रिलायंस जियो 40 कोटी सब्सक्राइबरचा हा आकडा मिळवणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे.

कोणी काय कमवले, काय गमावले

ट्राईच्या रिपोर्टनुसार जुलै मध्ये Jio कंपनीने आपल्या नेटवर्क वर 35 लाखांपेक्षा जास्त नवीन यूजर्स जोडले आहेत, या नवीन ग्राहकांमुळे जियोच्या एकूण सब्सक्राइबर्सची संख्या 40 कोटींच्या वर गेली. नवीन ग्राहकांमुळे देशातील टेलीकॉम बाजारात रिलायंस जियोचा मार्केट शेयर पण वाढून 35 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे.

देशातील दुसऱ्या मोठ्या टेलीकॉम कंपनी Bharti Airtel शी जोडल्या जाणाऱ्या नवीन यूजर्सच्या संख्येत पण वाढ झाली आहे. जुलै मध्ये जवळपास 33 लाख नवीन यूजर्स एयरटेल नेटवर्कशी जोडले होते. नवीन ग्राहक जोडल्यामुळे एयरटेलच्या एकूण सब्सक्राइबर्सची संख्या 32 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. देशाच्या टेलीकॉम बाजारात एयरटेलचा मार्केट शेयर 27.96 टक्के झाला आहे.

VI म्हणजे Vodafone Idea चे यूजर्स सतत कमी होत आहेत. जुलै मध्ये 37 लाखांच्या आसपास लोकांनी वोडाफोन आइडियाची सोबत सोडली. हे ग्राहक गेल्यामुळे वोडाफोन आइडियाच्या एकूण सब्सक्राइबर्सची संख्या 30 कोटींच्या आसपास गेली आहे आणि कंपनीचा मार्केट शेयर पण 26.34 टक्के झाला आहे.

देशातील सरकारी कंपनी BSNL म्हणजे भारतीय संचार निगम लिमिटेड पण हळूहळू का होईना पण भारतीयांचा विश्वास कमवत आहे. जुलै मध्ये 3 लाख 88 हजारच्या आसपास लोकांनी बीएसएनएलची निवड केली, त्यामुळे BSNL नेटवर्क वापर करणाऱ्या एकूण सब्सक्राइबर्सची संख्या वाढून 12 कोटी झाली आहे. सध्या इंडियन टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये 10.37 टक्के मार्केट शेअर वर बीएसएनएलची मजूबत पकड आहे.