Home बातम्या Jio 5G फोन झाला लिस्ट, यात आहे 1GB रॅम, ‘Made in india’ 5जी फोन करेल सर्वांची सुट्टी

Jio 5G फोन झाला लिस्ट, यात आहे 1GB रॅम, ‘Made in india’ 5जी फोन करेल सर्वांची सुट्टी

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Reliance Jio द्वारे अँड्रॉइड 5G फोन सादर केला जाणार असल्याची घोषणा केल्यापासून यूजर्स याची वाट बघत आहेत. यूजर्सच नाहीत तर इतर मोबाईल ब्रँड्स पण जियोच्या प्लानिंग वर नजर ठेऊन आहेत. Google सोबत मिळून 5जी फोन घेऊन येणाऱ्या रिलायंस जियोने अधिकृतपणे हँडसेटबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही. पण काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, त्यात सांगण्यात आले होते कि रिलांयस यावर्षी डिसेंबर मध्ये नवीन जियो स्मार्टफोन लॉन्च करू शकते. तसेच रिलायंसचा मॉडेल नंबर RC545L असलेला फोन गूगल प्ले कंसोल वर स्पॉट केला गेला आहे.

लिस्टिंग मध्ये समोर आलेला फोन रिलायंस ऑर्बिक स्मार्टफोन सीरीज अंतर्गत सादर केला जाऊ शकतो, त्यामुळे आशा आहे कि कंपनी पुन्हा एकदा Orbic स्मार्टफोन सीरीज परत आणण्याची तयारी करत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ऑर्बिक स्मार्टफोन्सना सर्टिफिकेशन्स पण मिळाले आहे. हि लिस्टिंग टिप्स्टर मुकुल शर्माने स्पॉट केली आहे.

गूगल प्ले कंसोल वर फोनचा फ्रंट लुक पण दाखवण्यात आला आहे. या फोटोनुसार फोन मध्ये टॉप आणि बॉटमला जाड बेजल्स असतील. फोनचा मागील लुक अजूनतरी समोर आला नाही. तसेच लिस्टिंगनुसार डिवाइस 18:9 आस्पेक्ट रेशियो सह एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल.

लिस्टिंगनुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन QM215 मोबाईल प्लॅटफॉर्म सह येईल तसेच डिवाइस आउट-ऑफ-द बॉक्स अँड्रॉइड 10 (गो एडिशन) सह येऊ शकतो. हा फोन एड्रीनो 306 जीपीयू सह येईल. गूगल प्ले कंसोलच्या लिस्टिंग मध्ये या फोनच्या रॅम बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण बोलले जात आहे कि हा एंट्री लेवलचा स्वस्त स्मार्टफोन असेल त्यामुळे यात 1जीबी रॅम असेल.

किंमत

किंमत पाहता, अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता, त्यात सांगण्यात आले होते कि हा फोन एक एंट्री लेवल हँडसेट असेल. या फोनची किंमत 54 डॉलर म्हणजे 4000 रुपयांच्या आसपास असेल.