Categories: बातम्या

जियो ने परत मारली बाजी, मार्च महिन्यात कमावले 94 लाख यूजर्स, एयरटेल-वोडाफोन-आयडिया रेस मध्ये मागे

भारतात वेगाने वाढणार्‍या टेलीकॉम ग्राहकांचा भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (ट्राई) ने काल आपला रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की मार्च महिन्यात देशात 120.6 कोटी पेक्षा जास्त टेलीकॉम यूजर्स​ मोजले गेले. भारतीय टेलीकॉम यूजर्स संबंधी आकडे तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता. यूजर्स संबधी आकडेवारी सह ट्राई ने टेलीकॉम कंपन्यांन बाबतीत रोचक खुलासे केले आहेत, ज्यात सांगण्यात आले आहे की जियो ने अन्य कंपन्यांपेक्षा देशात सर्वात जास्त यूजर्स जोडले आहेत.

ट्राई ने आपल्या रिपोर्ट मध्ये देशातील टेलीफोन यूजर्स ची आकडेवारी शेयर केली आहे. ट्राई चे हे आकडे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या स्टडी च्या आधार वर सादर केले आहेत. या रिपोर्ट नुसार मार्च महिन्यात रिलायंस जियो ने 94 लाख पेक्षा जास्त नवीन ग्राहक आपल्या नेटवर्क शी जोडले आहेत. या यादीत जियो नंतर आयडिया चे नाव आहे जीने 91 लाख नवीन यूजर्स मिळवले आहेत. तिसर्‍या नंबर वरील एयरटेल ने 84 लाख आणि चौथ्या नंबर वरील वोडाफोन ने 56 लाख च्या आसपास नवीन यूजर्स आपल्या नेटवर्क शी जोडले आहेत.

हा रिपोर्ट बघून हे पण समजते की आपल्या प्लान्स आणि आॅफर्स च्या जोरावर रिलायंस जियो आणि आयडिया सर्वात जास्त कस्टमर्स आकर्षित करण्यास यशस्वी झाले आहेत. असे बोलले जात आहे की जियो च्या या लिस्ट मध्ये टॉप वर येण्यामागे एक मोठे कारण कंपनी चा 4जी फीचर फोन जियोफोन पण आहे. विशेष म्हणजे जियोफोन हा देशातील सर्वात जास्त विकला गेलेला फीचर फोन आहे आणि त्यामुळे देशातील फीचर फोन बाजारात जियो जवळपास 35.8 टक्के भागावर राज्य करते.

मार्केट शेयर्स पाहत जियो कडून सर्वाधिक कस्टमर्स जोडले गेले असूनही मार्च 2018 पर्यंत एयरटेल सर्वात जास्त 25.7 टक्के शेयर वर कब्जा करून आहे. 18.82 टक्के शेयर्स सह वोडाफोन दुसर्‍या आणि 17.85 टक्के शेयर्स सह आयडिया तिसर्‍या नंबर वर आहे. रिलायंस जियो शेयर्स च्या लिस्ट मध्ये 15.76 टक्क्यां सह चौथ्या नंबर वर आली आहे आणि 9.44 टक्के मार्केट शेयर सह सरकारी कंपनी बीएसएनएल पाचव्या नंबर वर आहे.

Published by
Siddhesh Jadhav