सॅमसंग येत्या काही महिन्यामध्ये नेक्स्ट जेन प्रीमियम फोल्ड आणि फ्लिप डिव्हाईस लाँच करेल. यात गॅलेक्सी झेड फ्लिप 6 आणि Samsung Galaxy Z Fold 6 येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी गॅलेक्सी झेड फ्लिप 6 बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर स्पॉट झाला होता. तसेच, आता अगामी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 समोर आला आहे. ज्यात प्रमुख स्पेक्सची माहिती मिळाली आहे. चला, पुढे लिस्टिंग सविस्तर जाणून घेऊया.
Samsung Galaxy Z Fold 6 गीकबेंच लिस्टिंग
- सॅमसंगच्या नवीन प्रीमियम फोल्ड फोनला माय स्मार्ट प्राईसने SM-F956U मॉडेल नंबरसह गीकबेंचवर स्पॉट केले आहे. हा यूएस मॉडेल असण्याची शक्यता आहे.
- बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर Samsung Galaxy Z Fold 6 नं सिंगल-कोर राऊंडमध्ये 1,964 अंक आणि मल्टी-कोर राऊंडमध्ये 6,619 अंक मिळवले आहेत.
- गॅलेक्सी झेड फोल्ड 6 गीकबेंच लिस्टिंगवरून कोडनेम पाईन अॅप्पलची माहिती मिळाली आहे. यात 1+3+2+2 ऑक्टाकोर चिपसेट आणि एड्रेनो 750 जीपीयू पाहायला मिळेल.
- वेबसाईटवर प्रोसेसरचे नावा नाही, परंतु हा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिप असू शकतो.
- गीकबेंच डेटाबेस वरून समजले आहे की गॅलेक्सी झेड फोल्ड 6 मध्ये जवळपास 12GB रॅम असेल.
- ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत Samsung Galaxy Z Fold 6 फोन अँड्रॉईड 14 वर आधारित सांगण्यात आले आहे.
Samsung Galaxy Z Fold 6 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)
- Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळण्याची गोष्ट पहिली पण समोर आली आहे. गीकबेंचवर पण या चिपसेटचे संकेत मिळाले आहेत.
- सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 नेवी, लाइट पिंक, सिल्व्हर शॅडो , क्राफ्टेड ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो.
- स्टोरेजच्या बाबतीत गॅलेक्सी झेड फोल्ड 6 मध्ये 256GB, 512GB आणि 1TB पर्यंत स्टोरेज असण्याची शक्यता आहे.
- Samsung Galaxy Z Fold 6 मोबाईल 3C लिस्टिंगनुसार 25W वायर्ड फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह ठेवला जाईल.
शेवटी तुम्हाला सांगतो की सॅमसंग Samsung Galaxy Z Fold 6 आणि Samsung Galaxy Z Flip 6 जुलै महिन्यामध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.
