Home बातम्या 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग वाले हे आहेत बेस्ट प्रीपेड प्लान, बाग किती मिळेल डेटा आणि कोणते मिळतील फायदे

400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग वाले हे आहेत बेस्ट प्रीपेड प्लान, बाग किती मिळेल डेटा आणि कोणते मिळतील फायदे

रिलायंस जियो टेलिकॉम सेक्टर मध्ये आल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटाची लडाई अजून वाढली. या वाढत्या लढाईत जवळपास रोज एयरटेल, वोडाफोन आइडिया आणि बीएसएनएल सारख्या कंपन्या नवीन आकर्षक प्लान लॉन्च करत आहेत. ते पाहता आज आम्ही तुम्हाला रिलायंस जियो, एयरटेल, वोडाफोन आइडिया आणि बीएसएनएल च्या त्या प्लान्स बद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे आणि या प्लान मध्ये तुम्हाला शानदार डेटा आणि कॉलिंग मिळेल.

Jio
रिलायंस जियो बद्दल बोलायचे तर कंपनीच्या 399 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 1.5जीबी डेटा प्रतिदिन सह 84 दिवसांची वैधता मिळते. तसेच कंपनी कडून यूजर्सना प्रतिदिन 100एसएमएस मिळतील. या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉल मोफत मिळतील. तसेच सर्व जियो ऍप्सचा कॉम्प्लिमेंट्री एक्सेस मिळेल, ज्यात जियोसिनेमा, जियोटीवी आणि इतर जियो सर्विस मिळतील.

400 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लान मध्ये जियोचा 349 रुपयांचा प्लान पण येतो. या प्लान मध्ये यूजर्सना 1.5जीबी डेटा प्रतिदिन, अनलिमिटेड कॉल, 100 फ्री एसएमएस आणि जियो ऍप्सचे सब्सक्रिप्शन मिळेल. सोबत या प्लान मध्ये 70 दिवसांची वैधता मिळेल.

Airtel
एयरटेल कडून 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या प्लान बद्दल बोलायचे तर यात पण तुम्हाला जवळपास जियोच्या प्लान प्रमाणे लाभ मिळतील. या प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्स मिळत आहेत, त्यांची वॅलिडिटी 84 दिवस आहे. या प्लान मध्ये तुम्हाला प्रतिदिन 1जीबी 3जी/4जी डेटा मिळेल. तसेच वॅलिडिटी मध्ये तुम्हाला एकूण 84जीबी डेटा मिळेल. तसेच डेली 100एसएमएस पण मिळत आहेत. याआधी या प्लान मध्ये 70 दिवस वॅलिडिटी सह 1.4जीबी डेटा दिला जात होता. काही यूजर्सना 84 दिवस वॅलिडिटी पण मिळत होती.

Vodafone
399 रुपयांच्या प्लान मध्ये कंपनी 84 दिवसांसाठी 84जीबी डेटा देते. याचा अर्थ असा कि या प्लान मध्ये यूजर्सना 1जीबी डेटा प्रतिदिन मिळतो. तसेच कंपनी कडून यूजर्सना प्रतिदिन 100एसएमएस मिळतील. या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉल मोफत मिळतील.

Idea
आइडिया ने आपला 392 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. याची वैधता 60 दिवस आहे. या प्लान मध्ये यूजरला 250 मिनिटे रोज आणि 1000 मिनिटे आठवड्याला टॉकटाइम मिळतो. तसेच कंपनी कडे 399 रुपयांचा प्लान पण आहे. ज्यात यूजरला 1जीबी डेटा रोज मिळतो. यात पण यूजरला 250 मिनट मिनिटे रोज आणि 1000 मिनिटे आठवड्याला मिळतात. याची वैधता 84 दिवस आहे. या प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्स मिळतात.

BSNL
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सध्या सर्वात जास्त टक्कर जियो आणि एयरटेलला देत आहे. सरकारी टेलीकॉम कंपनी असूनही कंपनी आपल्या नवीन प्लानने ग्राहकांना आकर्षित करत आहे. बीएसएनएल च्या 349 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 64 दिवस वैधता मिळते. तसेच या पॅक मध्ये यूजर्सना प्रतिदिन 3.2जीबी डेटा मिळतो. तर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सोबत ग्राहकांना 100 एसएमएस डेली फ्री मिळतात. पण हा प्लान मुंबई आणि दिल्ली सर्कल मध्ये वैध नाही.