रिलायंस जियो ने आपल्या 4जी फीचर फोन ची सेकेंड जेनेरेशन सादर केली आहे. जियोफोन 2 सोबत कंपनी ने ही घोषणा पण केली होती की जियोफोन फक्त 501 रुपयांमध्ये एक्सचेंज आॅफर अंतर्गत विकत घेता येईल. ही आॅफर कंपनी ने ‘जियो मॉनसून हंगामा आॅफर’ नावाने सादर केली होती ज्यात कोणत्याही जुन्या फोनच्या बदल्यात फक्त 501 रुपये देऊन जियोफोन विकत घेता येऊ शकतो. जियो ने या आॅफर ची शेवटची तारीख 31 जुलै ठेवली होती. पण आता 91मोबाईल्सला बातमी मिळाली आहे की जियो ने या आॅफर ची शेवटची तारीख वाढवून 15 ऑगस्ट केली आहे.
रिलायंस जियो ने ‘जियो मॉनसून हंगामा आॅफर’ ची अंतिम तारीख 15 ऑगस्ट केली आहे. म्हणजे कोणीही आता 15 ऑगस्ट पर्यंत आपला कोणताही जुना फीचर फोन जियोस्टोर मध्ये देऊ शकतो आणि बदल्यात फक्त 501 रुपये देऊन नवीन 4जी फीचर फोन जियोफोन घेऊ शकतो. या आॅफर ची सुरवात 21 जुलै पासून झाली आहे तसेच यूजर रिलायंस जियो च्या वेबसाइट वर जाऊन एक्सचेंज आॅफर साठी रजिस्ट्रेशन करू शकते.
आता पर्यंत जियोफोन मध्ये 4जी स्पीड ने इंटरनेट तर वापरता येत आहे पण हा फोन देशात प्रसिद्ध असलेला व्हाट्सॅप वापरू देत नाही. परंतु जियोफोन 2 च्या लॉन्च सोबतच जियो ने ही पण घोषणा केली की आता जियोफोन मध्ये पण व्हाट्सॅप सपोर्ट येईल त्याचबरोबर या फोन मध्ये फेसबुक पण वापरता येईल.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रिसर्च फर्म काउंटर प्वाइंट ने एक रिपोर्ट सादर करून सांगितले होते की एकट्या जियोफोन ने देशातील 47 प्रतिशत फीचर फोन कवर करत रेकॉर्ड सेल केला आहे. हा रिपोर्ट साल 2018 च्या दुसर्या तिमाहीचा होता. या लिस्ट मध्ये जियो नंतर सॅमसंग दुसर्या आणि नोकिया तिसर्या नंबर वर आली आहे. याच काळात सॅमसंग कडे 9 टक्के मार्केट शेयर आहे तर नोकिया चा मार्केट शेयर 7 टक्के आहे.
तुमच्याकडे एखादा जुना फीचर फोन असेल आणि तुम्हाला रिलायंस जियो चा 4जी फीचर फोन घ्यायचा असेल तर तुम्ही या जियो मॉनसून हंगामा आॅफर ची माहिती खाली दिलेल्या लिंक वरून वाचू शकता.
जियो मॉनसून हंगामा आॅफर
