एलजी ने एक आठवड्यांपूर्वी आपल्या ‘क्यू सीरीज ‘ अंतर्गत तिन स्मार्टफोन क्यू स्टाइलस, क्यू स्टाइलस प्लस आणि क्यू स्टाइलस अल्फा सादर केले होते. हे तिन्ही स्मार्टफोन अजून अंर्तराष्ट्रीय बाजारात सेल साठी उपलब्ध पण झाले नाहीत इतक्यात कंपनी चा अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च साठी तयार आहे. ही माहिती एलजी दिली नाही तर एका लीक मध्ये एलजी च्या नवीन स्मार्टफोन स्टाइलो 4 समोर आल्याने फोन लॉन्च ची बाब स्पष्ट झाले आहे. या लीक मधून एलजी स्टाइलो 4 च्या रिटेल बॉक्स चा फोटो इंटरनेट वर वायरल झाला आहे.
एलजी स्टाइलो 4 च्या रिटेल बॉक्स चा फोटो स्लॅशलीक ने आपल्या प्लॅटफार्म वर शेयर केला आहे. या फोन चा रिटेल बॉक्स समोर आल्याने हे स्पष्ट झाले आहे की एलजी ने आपला नवीन फोन पूर्णपणे तयार केला आहे आणि आगामी काही दिवसांमध्ये हा फोन टेक जगात लॉन्च केला जाईल. एलजी स्टाइलो 4 च्या रिटेल बॉक्स वरून फोन च्या डिजाईन सह याच्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे.
एलजी स्टाइलो 4 को 18:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे. बॉक्स नुसार हा फोन 1920 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या टीएफटी फुलविजन डिस्प्ले सह सादर केला जाईल. या फोन मध्ये एंडरॉयड 8.1 ओरियो असल्याचे बोलले जात आहे तसेच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम च्या चिपसेट वर चालेल. बॉक्स वरून चिपसेट सीरीज ची माहिती मिळत नाही पण अंदाज लावला जात आहे की फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट दिला जाईल.
बॉक्स वरून समोर समोर आले आहे की फोन मध्ये 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज असेल जी माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी साठी स्टाइलो 4 च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा असेल तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असेल. एलजी चा हा फोन ‘स्टाइलो पेन’ ला सपोर्ट करेल तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.
