वर्षभरापासून सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन आणण्याचा दावा करत आहे. एलजी ने घोषणा केली आहे की ते एक नव्हे तर दोन असे फोन घेऊन येईल जे डायरी प्रमाणे घडी करता येतील. सॅमसंग कदाचित याच महिन्यात आपला फोल्डेबल फोन टेक मंचावर सादर करेल. पण या दोन्ही मोठ्या कंपन्यांना मागे टाकत एका चीनी कंपनी ने संपूर्ण स्मार्टफोन बाजाराला आश्चर्याचा धक्का देत जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन प्रस्तुत केला आहे.
जगातील पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनचा लॉन्च केला आहे चीनी कंपनी Rouyu Technology ने. जगातील या पहिल्या फोल्डेबल फोनला फ्लेक्सपाई (FlexPai) नाव देण्यात आले आहे. हा डिवाईस एका टॅबलेट प्रमाणे आहे जो घडी होऊन फोन मध्ये रुपांतरीत होतो. खास बाब अशी की घडी केल्यानंतर या फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर डिस्प्ले येतो. उघडल्यानंतर या फोनची डिस्प्ले साईज 7.8-इंच असते तर घडी केल्यावर 4-इंचाच्या दोन स्क्रीन होतात.
FlexPai मध्ये एमोलेड डिस्प्ले वापरण्यात आला आहे. फोन घडी केल्यानंतर दोन्ह डिस्प्ले वापरता येतात. जो डिस्प्ले तुम्ही वरच्या बाजूला ठेवाल त्यावर ती टच स्क्रीन तुम्हाला वापरता येईल तर खाली असलेल्या दुसर्या डिस्प्ले वर आपोआप वॉलपेपर येईल. वापरताना फोन पलटल्यास आपोआप एक्टिव अॅप व अन्य मेन्यू वर आलेल्या डिस्प्ले वर येतील. कंपनी ने दावा केला आहे की त्यांनी टेस्टिंग साठी हा फोन जवळपास 2,00,000 वेळा उघडला व बंद केला आहे आणि फोन तरीही चांगला चालला.
रिपोर्ट नुसार हा फोन एंडरॉयड च्या कस्टम वर्जन वॉटर ओएस सह सादर करण्यात आला आहे सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8150 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये 6 जीबी रॅम देण्यात आली आहे. फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअप फोनच्या एकाच बाजूला आहे जो फोन फोल्ड झाल्यावर सेल्फी कॅमेऱ्याचे काम पण करतो.
विश्वातिल पाहिल्या फोल्डेबल फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट पण लॉन्च करण्यात आला आहे जो 512जीबी स्टोरेज सह येतो. FlexPai मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 3,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची बेस किंमत 8,999 युआन आहे जी भारतीय करंसी अनुसार जवळपास 95,000 रुपये आहे. चीन मध्ये हा फोन प्रीआॅर्डर साठी उपलब्ध झाला आहे जो काही दिवसांत सेल साठी सादर केला जाईल.
