Home बातम्या सलमान खानने काढला Realme 6 ने फोटो, 64एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह लवकरच होईल भारतात लॉन्च

सलमान खानने काढला Realme 6 ने फोटो, 64एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह लवकरच होईल भारतात लॉन्च

अनेक दिवसांपासून चालू असलेली 5G ची शर्यत काल संपली आहे. गेल्यावर्षी पासून वाट बघितली जात होती कि भारतात 5जी स्मार्टफोन कधी येईल. आणि यापेक्षा पण मोठा प्रश्न असा होता कि हा 5जी फोन कोणता ब्रँड सर्वात आधी सादर करेल. काल या सर्व प्रश्नांना उत्तर देत Realme ने भारतीय बाजारातील पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन Realme X50 Pro नावाने बाजारात आला आहे जो फक्त शानदार लुक नाही तर दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. Realme X50 Pro च्या मध्यमातून कंपनीने इंडियन मार्केटला पहिला 5जी फोन पण दिला आहे.

Realme ने कालच भारतीय बाजारात आपला पहिला 5G स्मार्टफोन Realme X50 Pro लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन भारतातील पहिला 5जी फोन म्हणून पुढे आला आहे जो खूप पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह आला आहे. फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये एक्स50 प्रो लॉन्च केल्यानंतर आता रियलमी मीड बजेट मध्ये आपला नवीन फोन आणण्याची तयारी करत आहे. बातमी समोर येत आहे कि रियलमी लवकरच भारतात आपली Realme 6 सीरीज लॉन्च करू शकते. सीरीजच्या एका फोन मधून काढलेला फोटो Realme ने इंटरनेट वर शेयर केला आहे आणि या फोटो मध्ये रियलमी इंडिया हेड माधव सेठ यांच्या सोबत बॉलीवुड स्टार सलमान खान पण दिसत आहे.

Realme 6 लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो आणि हि बातमी लीक मध्ये आलेली नसून रियलमी सीईओ द्वारे शेयर केल्या गेलेल्या एका फोटो मधून समोर आली आहे. रियलमी मोबाईल्सचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्वीटर हँडेल वर एक फोटो शेयर केला आहे ज्यात माधव यांच्या सोबत सलमान खान पण उभा आहे. सलमान खान व्यतिरिक्त फोटो मध्ये एक खास बाब अशी आहे कि हा Realme 6 स्मार्टफोन द्वारे काढण्यात आला आहे.

समोर आलेल्या फोटो मध्ये Realme 6 चा वॉटरमार्क देण्यात आला आहे. फोटो मध्ये खाली Realme चा लोगो आहे ज्याच्या सोबत ’64MP AI Quad Camera’ लिहिण्यात आले आहे. या मार्क वरून स्पष्ट झाले आहे कि रियलमी 6 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येईल आणि फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. Realme 6 चा रियर कॅमेरा सेटअप आर्टिफिशियल इंटेलिजेंट टेक्नॉलॉजी सह येईल. सलमान खानच्या या फोटो मध्ये खालच्या बाजूला Shot on Realme 6 पण लिहिण्यात आले आहे.

Realme 6

रियलमी 6 काही दिवसांपूर्वी वाई-फाई अलायंस वर Realme RMX2001 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता. थेट स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर या सर्टिफिकेशन मध्ये सांगण्यात आले आहे कि रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह येईल जो रियलमी वन यूआई सह लॉन्च होईल. Realme 6 मध्ये प्रोसेसिंगसाठी MediaTek MT6785T चिपसेट असल्याचा खुलासा झाला आहे. हा चिपसेट बाजारात मीडियाटेक हेलियो जी90 नावाने सादर होईल.

विशेष म्हणजे मीडियाटेक हेलियो जी90 चिपसेट वर अजूनतरी कोणताही स्मार्टफोन लॉन्च झाला नाही. म्हणजे Realme 6 जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक हेलियो जी90 सह बाजारात येईल. विशेष म्हणजे गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Redmi Note 8 Pro मध्ये मीडियाटेक हेलियो जी90टी चिपसेट दिसला होता. तसेच Realme 6 मध्ये असलेला मीडियाटेक हेलियो जी90 चिपसेट यापेक्षा ऍडव्हान्स असेल. वाई-फाई अलायंस नुसार रियलमी 6 मध्ये 2.4गीगाहर्ट्ज आणि 5गीगाहर्ट्ज चा वाई-फाई बॅंड मिळेल.