साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung सध्या अनेक नवीन स्मार्टफोन्स वर काम करत आहे. अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी लवकरच गॅलेक्सी एफ सीरीज मध्ये आपला पहिला फोन सादर करणार आहे. तसेच आजच 91मोबाईल्सने बातमी दिली कि A सीरीजचा Samsung Galaxy A02 गीकबेंच वर दिसला आहे. आता Samsung Galaxy A52 बद्दल एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्ट मध्ये Samsung Galaxy A52 च्या कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे. कंपनीकडून Galaxy A52 बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण असे बोलले जात आहे कि Samsung Galaxy A52 यावर्षीच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरवातीला लॉन्च केला जाऊ शकतो.
Galaxy Club च्या एका रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये एक मॅक्रो कॅमेरा असेल, पण झूम लेंस दिली जाणार नाही. त्याचबरोबर हँडसेट मध्ये 64-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. विशेष म्हणजे Samsung Galaxy A51 मध्ये 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर देण्यात आला होता. आता पर्यंत गॅलेक्सी ए52 च्या वाइड-अँगल कॅमेरा आणि डेप्थ सेंसर बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. रिपोर्टनुसार Samsung Galaxy A52 मध्ये 5G सपोर्ट असेल. आशा आहे कि हा फोन आधीच्या मॉडेल प्रमाणेच एलटीई वेरिएंट मध्ये पण उपलब्ध होईल. Samsung Galaxy A52 जानेवारी मध्ये ट्रेडमार्क केला गेला होता. या फोन व्यतिरिक्त अजून पण काही फोन्स ट्रेडमार्क करण्यात आले होते.
Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. सॅमसंगने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह सादर केला आहे ज्यात स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो. सॅमसंग गॅलेक्सी ए51 अँड्रॉइड 10 आधारित वन यूआई 2.0 वर लॉन्च झाला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.
इंडियन मार्केट मध्ये Samsung Galaxy A51 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे तसेच दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. सॅमसंग गॅलेक्सी ए51 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A51 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.
