सॅमसंग एक फोल्डेबल फोन बनवत आहे सर्व स्मार्टफोन यूजर्सना माहित आहे. सॅमसंगच्या या फोल्डेबल स्मार्टफोन बद्दल ऐकून एक वर्ष झाले पण अजूनही कंपनी ने आपला अनोखा प्रोडक्ट सदर केला नाही. सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल आता पर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या डिजाईन आणि याच्या डिस्प्ले बद्दल अनेक गोष्टी वाचनात आल्या आहेत. पण आता स्वतः सॅमसंग मोबाइल बिजनेस चे सीईओ डी जे कोह ने सॅमसंग फोल्डेबल फोन संबंधित मोठे विधान केले आहे.
सॅमसंगचे वरिष्ठ अधिकारी डी जे कोह ने कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनच्या डिजाईन बद्दल मोठा खुलासा केला आहे. कोह ने सीनेटला दिलेल्या एका मुलाखतीती सांगितले आहे कि कंपनीचा फोल्डेबल डिवाईस टॅबलेट आणि फोन दोन्हीचे काम करेल. हा डिवाईस टॅबलेटच्या आकाराचा असेल पण यूजर याला फोल्ड म्हणजे घडी करून एखाद्या फोन प्रमाणे आपल्या खिशात ठेवू शकतील.
कोह नुसार सॅमसंगचा फोल्डेबल डिवाईस यूजर्सना मल्टीटास्क करण्यास उपयोगी पडेल. कोह ने सांगितले आहे कि हा डिवाईस मल्टी टास्किंग सोबत इझी पॉर्टबिलिटी सह येईल. म्हणजे यूजर्स टॅबलेट म्हणून यावर आपली कामे करू शकतील आणि एखाद्या फोन प्रमाणे याला खिशात ठेऊन फिरू पण शकतील. सीनेटला कोह ने सांगितले आहे कि हा फोल्डेबल फोन यूजर्सच्या उपयोगी पडणे गरजेचे आहे आणि याचीच काळजी आम्ही घेत आहोत.
सॅमसंगच्या अधिकाऱ्याने आपल्या मुलाखतीती सांगितले आहे कि, आम्ही असा प्रॉडक्ट बनवू इच्छित नाही जो ग्राहकांना विकल्यांनंतर त्यांना चांगला अनुभव देऊ शकणार नाही. आम्ही असे काहीच करणार नाही ज्यामुळे प्रॉडक्ट बाजारात आल्यानंतर 6 ते 9 महिन्यात त्याची निर्मिती बंद होईल.
कोह यांनी सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन कधी येईल याची माहिती दिली नाही. पण ते म्हणाले कि जेव्हा आम्ही फोल्डेबल फोन घेऊन येऊ तेव्हा तो आमच्या युजर्ससाठी महत्वपूर्ण असेल. ज्यात यूजर एक्सपीरियंस सॅमसंगच्या मापदंडानुसार मिळत नाही असा कोणताही प्रॉडक्ट बाजारात आणायला मला आवडणार नाही.
सॅमसंग सीईओ आणि सीनेट मध्ये झालेल्या या चर्चेतून हे स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग फक्त आपल्या फोल्डेबल फोन कडून अपेक्षा ठेऊन आहे असे नाही तर सोबतच आपल्या फॅन्सना ते एक दर्जेदार डिवाईस देऊ इच्छित आहेत. आशा आहे कि सॅमसंग लवकरच आपला अनोखा फोन जगासमोर सादर करेल.
